सोफिया लॉरेन या हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या सोफिया आज वयाच्या ८६ व्या वर्षी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत. ‘अ लाईफ अहेड’ या आगामी चित्रपटात त्या झळकणार आहेत.

या चित्रपटात सोफिया ‘मादाम रोझ’ ही भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट प्रसिद्ध लेखक रोमन गॅरी यांच्या ‘द लाईफ बिफोर अस’ या कादंबरीवर आधारित आहे. १९७०च्या दशकात ही कादंबरी प्रचंड चर्चेत होती. या पुस्तकावर एक नाटक देखील तयार करण्यात आलं होतं. त्यावेळी फ्रेंच अभिनेत्री सिमोन सिग्नोरेट यांनी ‘मादाम रोझ’ ही भूमिका साकारली होती. ‘अ लाईफ अहेड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सोफिया लॉरेन यांचा मुलगा एडोआर्डो पोन्टी याने केलं आहे. सुपरस्टार सोफिया लॉरेन यांच्या पुनरागमनामुळे त्यांचे चाहते प्रचंड खुश आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. हा चित्रपट येत्या नोव्हेंबर महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

सोफिया लॉरेन या एक फ्रेंच अभिनेत्री आहेत. १९५१ साली ‘क्वोवाडिस’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्यांनी सहकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘द फॉल ऑफ द रोमन एम्पायर’, ‘हाऊस बोट’, ‘एल सीआयडी’, ‘अ स्पेशल डे’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. १९६०च्या दरम्यान त्यांनी इंग्लिश भाषा शिकण्यावर जोर दिला. फ्रेंच चित्रपटांना नकार देत त्या इंग्लिश भाषेच्या क्लालेसला हजेरी लावत होत्या. इंग्लिश भाषा शिकून त्यांनी हॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावून पाहिलं. त्यावेळी ‘ऑफरेशन क्रॉसबो’ या लो बजेट चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या चित्रपटात त्यांनी केलेला अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला. त्यानंतर ‘ब्लॅक ऑर्किड’ या चित्रपटातून त्या खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आल्या. त्यानंतर त्यांनी एकामागून एक ‘नाईन’, ‘ग्रम्पी ओल्ट मॅन’, ‘रेडी टू वेअर’, ‘ह्युमन वॉईज’, ‘माय हाऊस इज फुल ऑफ मीरर’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. आज त्या हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.