अमेरिकेतील दूरचित्रवाहिनीवरील एका मालिकेसाठी बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला नामांकन मिळाले आहे. ‘पीपल्स चॉइस अ‍ॅवॉर्ड’साठी प्रियांकाला हा बहुमान मिळाला आहे. ‘क्वांटिको’ या मालिकेत प्रियांका भूमिका करत असून त्या भूमिकेसाठी प्रियांकाला हे नामांकन मिळाले आहे.

प्रियांका या मालिकेत ‘एफबीआय’ एजंटची भूमिका करत असून अमेरिकन दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकेत काम करणारी आणि नामांकन मिळविणारी ती पहिली बॉलीवूड अभिनेत्री ठरली आहे. ‘पीपल्स चॉइस अ‍ॅवॉर्ड’साठी एकूण पंधरा अभिनेत्रींची निवड झाली असून त्यात प्रियांकाचा समावेश आहे. सोशल मीडियावरील लोकप्रिय ‘ट्विटर’ या माध्यमाद्वारे प्रियांकाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. हे नामांकन मिळाल्यामुळे आपल्याला आनंद झाला असून पहिल्या पदार्पणातच आपल्याला हे नामांकन मिळाल्याबद्दल तिने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. प्रेक्षक मतदानाद्वारे आपले मत नोंदवीत असून प्रेक्षक पसंतीच्या या पुरस्कारासाठी आपले नामांकन झाले आहे.