News Flash

सासू-सून पैठणीसाठी भिडणार,पण त्यात मात्र बबड्या अडकणार

या पर्वाचं नाव आहे "होम मिनिस्टर माझा बबड्या". 

‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर भावोजी गेली १६ वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. लॉकडाऊनच्या काळातसुद्धा होम मिनिस्टर घरच्या घरीच्या माध्यमातून आदेश भावोजी तमाम महाराष्ट्रातील वहिनींची ऑनलाईन भेट घेत आहेत. आता आदेश भावोजी होम मिनिस्टर घरच्या घरीचं नवीन पर्व ७ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या पर्वाचं नाव आहे “होम मिनिस्टर माझा बबड्या”.

आता तुम्हाला वाटलं असेल हे काय नवीन? तर ‘अग्गंबाई सासूबाई’ मधील ‘बबड्या’ हे पात्र खूपच चर्चेचा विषय झालाय. आशुतोष पत्कीने आपल्या अभिनयातून या पात्राला पुरेपूर न्याय दिलाय. प्रत्येक मूल हे आपल्या आईचं लाडकं असतं आणि प्रत्येक मुलात एक बबड्या लपलेला असतो. अशीच ‘बबडेगिरी’ एका मजेशीर पद्धतीने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सासू आणि सून आता पैठणीसाठी भिडणार, पण यात मात्र त्यांचा बबड्या अडकणार, अशी अनोखी संकल्पना आहे. ‘होम मिनिस्टर माझा बबड्या’ ७ सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 5:54 pm

Web Title: home minister majha babadya special show of adesh bandekar ssv 92
Next Stories
1 रोहिणी हट्टंगडी अजूनही करतायेत शूट फ्रॉम होम
2 पुरूषी मानसिकतेवर आधारित लघुपटाला जयंत सांकलाचे अनोखे संगीत
3 ‘रसोडे मे कौन था?’; अक्षय कुमारने दिलं मजेशीर उत्तर
Just Now!
X