21 October 2018

News Flash

‘होणार सून मी ह्या घरची’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

आठच्या ठोक्याला न चुकता बघितली जाणारी लोकप्रिय मालिका 'होणार सून मी ह्या घरची' या वर्षाअखेर बंद होणार आहे.

ही मालिका बंद होऊन दश्मी प्रॉडक्शनची नवी मालिका सुरु करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

महाराष्ट्रातील घराघरात रात्री आठच्या ठोक्याला न चुकता बघितली जाणारी लोकप्रिय मालिका ‘होणार सून मी ह्या घरची’ या वर्षाअखेर बंद होणार आहे. ही मालिका बंद होऊन दश्मी प्रॉडक्शनची नवी मालिका सुरु करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
फोटो गॅलरीः कलाचा कलकलाट पुढल्यावर्षी थांबणार
‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मालिका या वर्षाअखेर किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला सर्व प्रेक्षकांचा निरोप घेईल. जान्हवी-श्रीच्या बाळाचे आगमन शेवटच्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहता येईल. गेले अडीच वर्ष चालत आलेल्या या मालिकेने मराठी कुटुंबातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. जान्हवी आणि तिच्या सहा सासवांमुळे घराघरातील सासू-सुनेच्या नात्यात गोड बदल झाले. तर जान्हवीचा ‘काहीही हां श्री’ संवाद, तिचे बाळंतपण याविषयीचे भन्नाट विनोद सोशल मिडियावर बरेच गाजले. शशिकला बाईंचा (जान्हवीची आई) खाष्ट स्वभावाचा अनेकांनी राग केला पण त्यांची केलेल्या अप्रतिम अभिनयाची सर्वांनीच प्रशंसाही केली. श्री-जान्हवीचे प्रेम त्यांचे लग्न, सहा सासवा, समंसज बाबा, खाष्ट सासू अशा अनेक गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या मालिकेला आता टाटा बाय बाय करत नव्या मालिकेच्या आगमनासाठी सज्ज व्हा.

First Published on December 7, 2015 10:01 am

Web Title: honar soon me hya gharchi going to close