News Flash

श्री-जान्हवी पुन्हा येतायत प्रेक्षकांच्या भेटीला; ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेचं पुनःप्रक्षेपण

या वेळेत पाहू शकता मालिका..

होणार सून मी या घरची

जवळपास अडीच वर्ष ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने मराठी कुटुंबातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या मालिकेतील श्री आणि जान्हवी ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाली. श्री- जान्हवी आणि सहा सासू या सर्व व्यक्तिरेखांची चर्चा तमाम प्रेक्षकांच्या घरात व्हायची. इतकंच काय तर श्री आणि जान्हवीच्या समस्यादेखील प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले. अनेक गोष्टींमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या या मालिकेचा आस्वाद प्रेक्षकांना पुन्हा एकदा घेता येणार आहे.

लॉकडाउनमुळे मालिकांचं चित्रीकरण थांबलं असून प्रेक्षक नवीन मालिकांचे भाग पाहू शकत नाहीत. म्हणून झी मराठी वाहिनीने ‘जय मल्हार’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेसोबतच ‘होणार सून मी ह्या घरची’ या लोकप्रिय मालिकेचं पुनःप्रक्षेपण करायचा निर्णय घेतला आहे. ही मालिका प्रेक्षक दुपारी १२ ते ३ या वेळेत पाहू शकतात.

जान्हवीचा ‘काहीही हां श्री’ संवाद, तिचे बाळंतपण याविषयीचे भन्नाट विनोद सोशल मीडियावर बरेच गाजले. जान्हवीचे प्रेम, त्यांचे लग्न, सहा सासवा, समंसज बाबा, खाष्ट सासू अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 2:56 pm

Web Title: honar sun me hya gharchi popular marathi serial to start soon ssv 92
Next Stories
1 स्थलांतरित मजुरांसाठी सोनू सूदने शेअर केला आणखी एक नंबर
2 ऐश्वर्याला टोमणा मारणाऱ्या दिग्दर्शकाला बिग बींनी दिले उत्तर
3 “नेहरुंचे विचार आजही देशासाठी लागू”, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना दिग्दर्शकाचं अभिवादन
Just Now!
X