28 February 2021

News Flash

हनीप्रीतच्या आईने राखीकडे पाच कोटी रुपयांची मागणी करत ठोकला अब्रुनुकसानीचा दावा

राखीची यावर काय प्रतिक्रिया असणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

राखी सावंत

देशद्रोहाच्या आरोपाखाली कारागृहात असणाऱ्या बाबा राम रहीममुळे राखी सावंत अडचणीत आली आहे. राम रहिमची मुलगी हनीप्रीत हिच्या आईने ‘आयटम गर्ल’ राख सावंत विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. हा दावा करत राखीकडून भरपाई म्हणून पाच लाख रुपयांची मागणीही केली आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार मोमिन मलिक या वकिलांच्या मदतीने हनीप्रीतच्या आईने ही नोटीस पाठवली आहे. हनीप्रीतची आई, आशा यांनी पाठवलेली ही नोटीस पाहता आता राखीची यावर काय प्रतिक्रिया असणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाचा : पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात दोषी असणाऱ्या गुरमीत राम रहिमची मुलगी, हनीप्रीत हिच्याविषयी राखी सावंतने बरेच खुलासे केले होते. इतकेच नव्हे तर राम रहिमच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये राखी हनीप्रीतची भूमिका साकारणार असल्याचे कळत होते. ‘आज तक’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हनीप्रीतला याची माहिती मिळताच तिने राखीशी संपर्क साधत तुझ्याकडून ही अपेक्षा नसल्याचे वक्तव्य केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 5:46 pm

Web Title: honeypreet mother claims rakhi sawant has defamed her daughter sends rs 5 crore notice to sawant controversy
Next Stories
1 या परदेशी अभिनेत्रीचा ‘स्वैग से स्वागत’ व्हिडिओ वायरल
2 अशा प्रकारे केले जाणार ‘आरके’च्या चित्रपटांचे जतन
3 मित्र-मैत्रिणींसोबत गाणं गाणाऱ्या सारा अली खानचा व्हिडिओ व्हायरल
Just Now!
X