News Flash

आशा भोसलेंच्या चाहत्यांसाठी ‘पर्वणी’

या वयातही उत्साहाने स्टेज शो करणाऱ्या आशाताईंनी अमेरिकेच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी या संचाचे प्रकाशन केले.

| September 6, 2015 02:02 am

सर्वाधिक रेकॉर्डेड गाणी गाण्याचा विश्वविक्रम ज्यांच्या नावावर आहे, त्या ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले येत्या मंगळवारी ८३ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. आशाताईंच्या प्रदीर्घ आणि विविधरंगी कारकीर्दीचा आढावा घेण्यासाठी शेमारु कंपनीने ‘१०१ आशा भोसले हीट्स’ हा तीन डीव्हीडीजचा संच त्यांच्या चाहत्यांसाठी सादर केला आहे. या वयातही उत्साहाने स्टेज शो करणाऱ्या आशाताईंनी अमेरिकेच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी या संचाचे प्रकाशन केले. यातील ‘अनकही’, ‘चरित्रहीन’, ‘बंदिनी’ या चित्रपटांतील गीतांमुळे अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या डीव्हीडीतील विविध मूडमधील गाण्यांमुळे आशाताईंचे अष्टपैलुत्व नव्याने अधोरेखित झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 2:02 am

Web Title: hope the fans fun
टॅग : Asha Bhosle
Next Stories
1 ‘फॅण्टम’ खूश हुआ!
2 मनोगत
3 बाल गणेश पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X