गूढ भीतीने भारलेला, अचानक समोर येणारी अक्राळविक्राळ चेहऱ्याची भुताटकी, भूत आणि दैवी शक्ती यांच्यातील भांडण, हे सर्व पाहायला मिळतं हॉलिवूड चित्रपट ‘द नन’मध्ये. हा चित्रपट तीन आठवड्यांपूर्वी जगभरात प्रदर्शित झाला असून बक्कळ कमाई करण्यात त्याला यश मिळालं आहे. ‘कॉन्ज्युरिंग’ सीरिजमधला हा सर्वांत यशस्वी चित्रपट मानला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन आठवड्यांमध्ये या थरारपटाने सुमारे १४०० कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने भारतात पहिल्या तीन दिवसांत ३० कोटींहून अधिकची कमाई केली.

वाचा : या शर्यतीत आलियाला मागे टाकणार श्रद्धा

‘द नन’चं कथानक हे १९५२ मधल्या सेंट कार्टा स्थित ऐबीमधील एका घटनेभोवती फिरतं. या ऐबीमध्ये म्हणजेच जिथे नन राहत असतात तिथे काही अप्रिय घटना घडते. या ऐबीचं नक्की रहस्य काय आहे यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ‘द नन’मध्ये दडली आहेत. ‘काँज्युरिंग’ सिरिजमधल्या आधीच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ‘द नन’ कडेही मोठा प्रेक्षकवर्ग आकर्षित होत आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horror film the nun makes rs 1400 crore worldwide continues stellar run
First published on: 25-09-2018 at 19:32 IST