30 September 2020

News Flash

अभिनेता संजय दत्तला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग

काही दिवसांपूर्वी संजयला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

अभिनेता संजय दत्तला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. काही दिवसांपूर्वी संजयने कामातून ब्रेक घेत असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं. त्यानंतर त्याला तिसऱ्या स्टेजचा कर्करोग झाल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, आता त्याला चौथ्या टप्प्यातील कर्करोग झाल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.

कर्करोगाचं निदान झाल्यानंतर संजय लवकरच उपचारांसाठी विदेशात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र संजय दत्तला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता त्याला चौथ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचं निदान झालं आहे.


‘नमस्कार मित्रांनो, काही वैद्यकीय उपचारांसाठी मी कामापासून छोटा ब्रेक घेतो आहे. माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असून माझ्या प्रकृतीविषयी चिंता करू नका असं आवाहन मी चाहत्यांना करतो. त्याचप्रमाणे तब्येतीविषयी काही अफवा पसरवू नका. तुमच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या आधारे मी लवकरच परत येईन’, असं ट्विट काही दिवसांपूर्वी संजय दत्तने केलं होतं.

दरम्यान, संजयला कर्करोगाचं निदान झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली आहे. तसंच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 11:58 am

Web Title: hospital sources confirm sanjay dutt has stage 4 lung cancer ssj 93
Next Stories
1 ‘यापुढे कुठल्याही चुकीला माफी नाही’; अभिज्ञा भावेचा इशारा
2 ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांची करोनावर मात
3 आता ईडी सुशांत सिंह राजपूतच्या बॉडीगार्डची करणार चौकशी
Just Now!
X