21 January 2021

News Flash

VIDEO : चहलची होणारी पत्नी धनश्रीचा अफलातून डान्स पाहिलात का?

एकदा हा भन्नाट व्हिडीओ पाहाच

IPLचा १३वा हंगाम मोठ्या जल्लोषात खेळला गेला. स्पर्धेत अनेक अनुभवी आणि नव्या दमाच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने साऱ्यांना खुश केले. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल यानेदेखील आपल्या फिरकी गोलंदाजीने चाहत्यांना आनंदित केले. IPL संपवल्यानंतर आता तो यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत कधी लग्नाच्या बेडीत अडकणार याची सर्वत्र चर्चा रंगल्याचे दिसत आहे. धनश्री दुबईला IPLच्या सामन्यांना हजेरी लावताना दिसली. पण IPL संपल्यानंतर युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आणि धनश्री पुन्हा भारतात परतली. पण सध्या धनश्री तिच्या एका डान्समुळे प्रचंड चर्चेत आहे.

धनश्रीने गेले ३-४ दिवस आपल्या इन्स्टाग्रांम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत आहे. एका स्टु़डिओमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत ए दिल है मुश्किल या हिंदी चित्रपटातील ‘क्युटी पाय’ गाण्यावर डान्स करतानाचे हे व्हिडीओ आहेत. तिच्या या डान्सचं फॅन्सकडून प्रचंड कौतुक केलं जात आहे. या संपूर्ण डान्सचे छोटे छोटे व्हिडीओ तयार करून ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत आहेत. नुकताच तिने पोस्ट केलेला व्हिडीओ लाल रंगाच्या ड्रेसमधील आहे. संपूर्ण व्हिडीओतील हा माझा सर्वात आवडता भाग आहे असं तिने चाहत्यांना कॅप्शनमधून सांगितलं आहे. तसंच, दोन सहकाऱ्यांसोबत नृत्य करताना आनंद वाटल्याचंही तिने लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

दरम्यान, धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबर पैकी एक मानली जाते. तिच्या यू-ट्युब चॅनलचे २ मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला होता. लॉकडाउन काळात चहल घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होता. अनलॉक काळात चहलने सरावासाठी सुरुवात केली होती पण टीक-टॉकच्या व्हिडीओमुळे तो अधिक चर्चेत असायचा. असं असताना अचानक एक दिवस त्याने धनश्रीशी साखरपुडा केल्याची बातमी दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 6:35 pm

Web Title: hot dance video of youtube sensation dhanashree verma on instagram who got engaged to team india cricketer yuzvendra chahal watch vjb 91
Next Stories
1 निकाहनंतर पहिल्यांदाच पतीसोबत फिरायला गेली सना, पाहा व्हिडीओ
2 झी युवावर रविवारी उडणार ‘धुरळा’
3 “वेदनादायी गोष्ट हीच की, जवानही शेतकऱ्याचाच मुलगा”, स्वरा भास्करचं टि्वट
Just Now!
X