27 November 2020

News Flash

VIDEO : चहलच्या होणाऱ्या पत्नीचा ‘मुकाबला’ डान्स हिट

तुम्ही पाहिलात का तिचा भन्नाट डान्स?

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. युजवेंद्र चहलचा यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा सोहळा ८ ऑगस्टला संपन्न झाला. चहल आणि धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी दिली. धनश्रीने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यावेळी धनश्री खूपच चर्चेत होती. त्यानंतर सध्या ती पुन्हा एकदा तिच्या भन्नाट डान्समुळे चर्चेचा विषय ठरली आहे.

धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ती तिच्या काही साथीदारांसोबत भन्नाट डान्स करताना दिसते आहे. आजकाल सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ ढिगाने पडतात पण तिने निवडलेलं गाणं हे तितकंच खास आहे. डान्सचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या प्रभुदेवा यांनी कोरियोग्राफ केलेलं मुकाबला हे गाणं आहे. वरूण धवनसारख्या प्रतिभावंत डान्सरने यावर नृत्य केलं आहे. त्याच गाण्यावर धनश्रीने भन्नाट डान्स केला आहे.

 

View this post on Instagram

 

Muqabla… another favourite @varundvn @shraddhakapoor #reels #bollywood

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9) on

तिच्या या डान्सचं फॅन्सकडून प्रचंड कौतुक केलं जात आहे. डान्समध्ये तिने दाखवलेली ऊर्जा अप्रतिम असल्याच्या कमेंट्स त्या व्हिडीओवर आल्या आहेत. तिने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर तब्बल ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 2:29 pm

Web Title: hot dance video of youtube sensation dhanashree verma on prabhu deva muqabla song who got engaged to team india cricketer yuzvendra chahal vjb 91
Next Stories
1 “तुझं डोकं ठिकाणावर आहे का?” विचित्र फोटोमुळे अभिनेत्रीला केलं जातंय ट्रोल
2 विराट-अनुष्कानंतर ‘ही’ अभिनेत्री देणार गूडन्यूज?
3 सुशांतच्या कुटुंबीयांविरोधात रिया करणार कायदेशीर कारवाई
Just Now!
X