16 October 2019

News Flash

वादानंतर ‘हॉटस्टार’वरून काढून टाकला हार्दिक पांड्या, के एल राहुलचा एपिसोड

हार्दिक आणि लोकेश राहुल या दोघांनी 'कॉफी विथ करण' या शोमध्ये महिलांविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली होती.

हार्दिक पांड्या, करण जोहर, के एल राहुल

‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध चॅट शोचा क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुलचा नुकताच प्रसारित झालेला एपिसोड ‘हॉटस्टार’वरून काढून टाकण्यात आला आहे. हार्दिक आणि लोकेश राहुल या दोघांनी शोमध्ये महिलांविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोघांवर प्रचंड टीका झाली. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता ‘कॉफी विथ करण शो’चा ऑनलाइन स्ट्रिमिंग पार्टनर ‘हॉटस्टार’वरून तो एपिसोड काढून टाकण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर ‘स्टार वर्ल्ड’ या वाहिनीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या शोचे सर्व टीझर आणि फोटो काढून टाकले आहेत.

सोशल मीडियावर टिकेचा होणारा भडीमार पाहता हार्दिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जाहीर माफी मागितली होती. सर्वांची माफी मागत, महिला वर्गाचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे त्याने या पोस्टमध्ये म्हटले होते.

या दोघांनी केलेली विधाने BCCI ला चांगलीच खटकली. अशा विधानांमुळे BCCI ची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे या दोघांना या शो दरम्यान केलेल्या वक्तव्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या दोघांनी आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल या दोघांवर २ एकदिवसीय सामन्यांसाठी बंदी घालण्यात यावी असे मत BCCI च्या प्रशासकीय समितीचे CoA अध्यक्ष विनोद राय यांनी केले आहे, तर या समितीतील महिला सदस्या डायना एडलजी यांनी मात्र हे प्रकरण BCCI च्या कायदे समितीकडे वर्ग करण्याचे मत व्यक्त केले आहे.

 

First Published on January 11, 2019 11:58 am

Web Title: hotstar pulls down koffee with karan episode featuring hardik pandya and kl rahul