News Flash

अभिनेत्री किम शर्माविरोधात पोलिसांत तक्रार

घरकाम करणाऱ्या महिलेने मुंबईतील खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

किम शर्मा

बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा हिच्याविरोधात घरकाम करणाऱ्या महिलेने मुंबईतील खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. थकवलेला पगार मागितल्यास धमकी देत असल्याचा आरोप तिने या तक्रारीत केला आहे.

तक्रारदार नम्रता सोलंकी किमकडे मोलकरीण म्हणून काम करत होती. मात्र तिचा गेल्या महिन्याभराचा पगार किमने दिला नव्हता. किमच्या त्रासाला कंटाळून अखेर तिने नोकरी सोडली. काम केल्याचा एक महिन्याचा पगार घेण्यासाठी मंगळवारी नम्रता किमकडे गेली. तेव्हा पगार हवा असेल तर २४ तास घरात थांबावं लागेल, असं किमने तिला सांगितलं. नम्रताने थांबण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या किमने तिला खोट्या गुन्ह्यांत गुंतविण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या नम्रताने खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

नम्रताने दाखल केलेल्या तक्रारीवरून किमविरुद्ध अदखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप तिची चौकशी केली नसल्याचं खार पोलिसांनी म्हटलं आहे.

याआधीही मोलकरणीला शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी किम शर्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 11:27 am

Web Title: house help files complaint against actress kim sharma for allegedly denying her one month salary
Next Stories
1 इन्स्टाग्रामवर प्रभासचा पहिला फोटो; चाहत्यांकडून लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव
2 …अन् शाहरुख अनुपम खेर यांना म्हणाला, ‘मन्नतवर या आपण सापशीडी खेळू’
3 ‘कटप्पा’सोबत ऐश्वर्या करणार ऑनस्क्रीन रोमान्स
Just Now!
X