News Flash

Video : खळखळून हसवणाऱ्या ‘हाऊसफुल ४’चा ट्रेलर प्रदर्शित

ट्रेलरमधील अक्षय कुमारचा लूक पाहता सर्वांना 'भुल भुलैय्या' चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘हाऊसफुल ४’ चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटातील कलाकारांचे अतरंगी लूकमधील पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. ते पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता चाहत्यांच्या आनंदात भर घालत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचा ट्रेलर पाहता चित्रपटात सर्व कलाकारांचा पुनर्जन्म झाला असून त्यांना ६०० वर्षांपूर्वीचा काळ आठवत असल्याचे दिसत आहे. तसेच चित्रपटात सगळ्याच कलाकारांचा डबल रोल असणार आहे. ट्रेलरमधील अक्षय कुमारचा लूक पाहता सर्वांना ‘भुल भुलैय्या’ चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. हा ट्रेलर ऑस्ट्रेलिया, दुबई आणि युके येथे एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला आहे. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहता चित्रपट प्रेक्षकांना पोटधरुन हसवायला सज्ज असल्याचे दिसत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर पाहता अक्षय कुमार साकारत असलेल्या हॅरी या पात्राला ६०० वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आठवताना दिसत आहेत. हॅरी हा ६०० वर्षांपूर्वी माधवगडचा राजकुमार बालादीप सिंग असतो. तो एका राज्यातील तीन राजकन्यांच्या स्वयमवरासाठी पोहोचतो. या तीन राजकन्या क्रिती सनॉन, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा दाखवण्यात आल्या आहेत. दरम्यान अक्षय कुमार क्रितीच्या प्रेमात पडतो. तीन राजकन्यांना नृत्याचे प्रक्षिण देण्यासाठी बांगडू महाराज म्हणजे रितेश देशमुखला बोलवण्यात येते. रितेश देशमुख पूजा हेगडेच्या प्रेमात असतो. तर दुसरीकडे बॉबी देओल चेतनगडचा राजपूत्र क्रिती खरबंदवर प्रेम करत असतो.

६०० वर्षांनंतर जेव्हा या सर्व पात्रांचा पुनर्जन्म होतो आणि अचानक एक दिवस अक्षय कुमारला पूर्वजन्मातील त्यांचे विवाह आठवता. मात्र ६०० वर्षांपूर्वी झालेला विवाह आणि वर्तमानकाळात होणारे विवाह या गोंधळात अडकलेला तीन नायकांची कथा प्रेक्षकांना खळखळून हसवणारी आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

‘हाऊसफुल’ या फ्रँचाइजीमधला ‘हाऊसफुल ४’ हा चौथा चित्रपट आहे. अक्षय कुमारसोबतच रितेश देशमुख, क्रिती सनॉन, बॉबी देओल, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा अशी कलाकारांची फौज यामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजीने केले आहे. दिग्दर्शक साजिद खानवर #MeToo मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर फरहादकडे दिग्दर्शन सोपवले गेले. दिवाळीच्या मुहूर्तावर, २६ ऑक्टोबर रोजी हा कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 4:09 pm

Web Title: housefull 4 trailer is out avb 95
Next Stories
1 Video : प्रेमातील गोडवा जपणाऱ्या ‘रॉमकॉम’चा टीझर प्रदर्शित
2 सौंदर्याने घायाळ करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात होते यश चोप्रा
3 काळवीट शिकार प्रकरण : सुनावणीला सलमान खान अनुपस्थित
Just Now!
X