27 February 2021

News Flash

ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याच्या अफवांना उधाण, नेटकऱ्यांवर संतापले रणधीर कपूर

ऋषी कपूर यांच्या प्रकृतीबाबत कोणत्याही अफवा पसरवू नका असेही रणधीर कपूर यांनी म्हटले आहे

ऋषी कपूर यांना थर्ड स्टेजचा कॅन्सर झाल्याने ते उपचारांसाठी न्यूयॉर्कला गेल्याच्या चर्चांना बुधवारी उधाण आलं. यावर त्यांचा भाऊ आणि अभिनेते रणधीर कपूर चांगलेच संतापले आहेत. ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याच्या चर्चा म्हणजे अफवा असल्याचे कपूर कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे. ऋषी कपूर यांच्या काही चाचण्या होणे बाकी आहे. त्यांना काय त्रास आहे आणि ते कोणत्या आजाराने त्रस्त आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अॅडव्हान्स स्टेजचा कॅन्सर, थर्ड स्टेजचा कॅन्सर असा अंदाज लोक कसा काय लावत आहेत? असा प्रश्न रणधीर कपूर यांनी विचारला आहे.

ऋषीच्या सगळ्या चाचण्या झाल्यानंतर जो काही अहवाल येईल त्याबद्दल आम्ही माहिती देऊ मात्र तोपर्यंत कोणीही अफवा पसरवू नये असेही आवाहन यावेळी रणधीर कपूर यांनी केले आहे. मागच्या आठवड्यात म्हणजे २९ सप्टेंबरला ऋषी कपूर न्यूयॉर्कला रवाना झाले. तिथे रवाना होण्याआधी त्यांनी एक ट्विट केले आहे. मी कामातून छोटा ब्रेक घेऊन वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेत जातो आहे. माझ्या शुभचिंतकांनी काळजी करू नये किंवा कोणतेही अंदाज लावू नये. अभिनेता म्हणून ४५ वर्षे काम करतो आहे. अशात माझ्या शरीराने बऱ्याच गोष्टी सहन केल्या आहेत. तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांनी लवकरच परत येईन असे ट्विट त्यांनी केले.

यानंतर १ ऑक्टोबरला ऋषी कपूर यांच्या आईचे म्हणजेच कृष्णा कपूर यांचे निधन झाले. मात्र आईच्या अंत्यसंस्कारालाही ऋषी कपूर येऊ शकले नाहीत. ज्यानंतर ऋषी कपूरना कॅन्सर झाल्याच्या अफवा आणि चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगू लागल्या. याच नेटकऱ्यांना खडे बोल सुनवत रणधीर कपूर यांनी झापले आहे आणि ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 1:28 pm

Web Title: how can people speculate that rishi has cancer says brother randhir
Next Stories
1 …म्हणून सायनाच्या बायोपिकचं चित्रीकरण मध्येच थांबलं
2 तनुश्री-नाना पाटेकर वादावर अर्जुन म्हणतो…
3 तनुश्री दत्ताविरोधात बीडमध्ये अदखलपात्र गुन्हा
Just Now!
X