News Flash

‘अमिताभ रुग्णालयात, आता तू तुझं पोट कसं भरणार?’, ट्रोलरला अभिषेकने दिले सणसणीत प्रत्युत्तर

'आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो, तशी वेळ...'

अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन

करोना व्हायरसची लागण झाल्यामुळे सध्या महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दरम्यान काही जण बच्चन कुटुंबाला ट्रोलही करत आहेत. टि्वटरवर एका ट्रोलरने अभिषेकला ‘तुझे वडिल अमिताभ बच्चन रुग्णालयात आहेत. आता तू तुझं पोट कसं भरणार?’ असा सवाल केला होता. त्यावर अभिषेकने त्या ट्रोलरला सभ्य भाषेत पण तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले.

अभिषेकने ‘ब्रीद’ या त्याच्या वेब सीरीजबद्दल बुधवारी एक टि्वट केले होते. त्यावर एका ट्रोलरने कमेंट करताना अभिषेकची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. ‘तुझे वडील अमिताभ बच्चन रुग्णालयात आहेत. आता तू तुझं पोट कसं भरणार?’ असा सवाल केला. त्यावर अभिषेकने ‘सध्या तरी आम्ही दोघे रुग्णालयात झोपून खात आहोत’ असे उत्तर दिले.

त्यावर ट्रोलरने “गेट वेल सून सर…प्रत्येकाच्या नशिबात असे झोपून खाणे नसते” असे प्रत्युत्तर दिले. त्यावर अभिषेकने त्या ट्रोलरला चांगले जिव्हारी लागणारे उत्तर दिले. “आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो, तशी वेळ तुझ्यावर येऊ नये, सुरक्षित आणि तंदुरुस्त राहा. तुमच्या शुभेच्छांसाठी आभारी आहे मॅडम” असे उत्तर अभिषेकने दिले.

अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ११ जुलै रोजी त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. अभिषेकची पत्नी ऐश्वर्या व मुलगी आराध्यालाही करोनाची लागण झाली होती. आधी त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात आलं होतं. मात्र आठवडाभरानंतर दोघींना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऐश्वर्या व आराध्या यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 4:56 pm

Web Title: how he will fend for himself now that amitabh is unwell abhishek bachchan response is graceful dmp 82
Next Stories
1 ‘या’ दिग्दर्शकांचे काम आवडते- अक्षय इंडीकर
2 ‘मलाही अशी औषधे देण्यात आली होती ज्यामुळे मी…’,सिमी गरेवालचा सुशांतच्या चाहत्याला रिप्लाय
3 ट्विटर वॉरमध्ये कंगनाची माघार; स्वरा भास्करच्या तक्रारीनंतर ‘ते’ ट्विट केलं डिलिट
Just Now!
X