सलमान खानचा ‘रेस- ३’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. या सिनेमाने अवघ्या काही दिवसांमध्येच १०० कोटी रुपयांचा गल्ला कमावला. सिनेमात एकाहून एक सरस अॅक्शन सीन दाखवण्यात आली आहेत. या सीनपैकी एक सीन सध्या चांगलाच गाजत आहे तो म्हणजे जॅकलीन फर्नांडिस आणि डेजी शाह यांच्यातला अॅक्शन सीन. सिनेमात हा अॅक्शन सीन पाहताना फारच सोप्पा वाटतो. पण तसं अजिबातच नाहीये. या सीनसाठी ‘रेस- ३’ च्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतलीये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यूट्यूबवर सलमान खान फिल्म्स या चॅनलवरून दोन्ही मुख्य अभिनेत्रींमधल्या फाइट सीनचा मेकिंग व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. सिनेमातील या दृश्यात दोन्ही अभिनेत्रींमध्ये शाब्दिक बाचाबाची होते आणि त्या भांडू लागतात. या दृश्यासाठी जॅकलीन आणि डेजी दोघींनीही बरीच मेहनत घेतली होती. या दृश्याच्या चित्रीकरणावेळी खुद्द सलमानही तेथे उपस्थित होता. सलमाननेने या दृश्यासाठी जॅकलिनची मदतही केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How jacqualine and daisy shah cat fight shoot in race 3 see making video
First published on: 19-06-2018 at 16:50 IST