भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आज ११ डिसेंबर रोजी लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. विराटने इटलीतील टस्कनी येथे बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले. अगदी नेमक्या नातेवाईकांच्या हजेरीत हा लग्नसोहळा उरकला. विरुष्काच्या लग्नाने त्यांच्या चाहत्यांना धक्का तर बसलाच पण या जोडप्याने लग्नासाठी किती खर्च केला असेल असा प्रश्न अनेकांना पडला होता.

स्पोर्टवालाने दिलेल्या वृत्तानुसार विराट आणि अनुष्का यांचे बोर्गो फिनोकिएटो ( Borgo Finocchieto) नावाच्या रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळ पार पडला. हा जगातील दुसऱ्या क्रमांकावरचा महागडा रिसॉर्ट आहे. फ्लोरेन्स विमानतळपासून तासाभराच्या अंतरावर टस्कनीतील निसर्गरम्य ठिकाणी बोर्गो रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये २२ बेडरुम्स आणि सुट्सची व्यवस्था आहे. तसेच, स्विमिंगपूल, जीम, स्पा, टेनिस कोर्टची सुविधाही यात आहे. या रिसॉर्टमध्ये प्रती व्यक्ती खर्च तब्बल १ कोटी रुपये आहे. विराटा आणि अनुष्काच्या लग्नाला जवळपास ४४ लोकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे पाहुण्यांच्या खाण्यापिण्याचा आणि राहण्याचा खर्च ४४ ते ४५ कोटी रुपये झाला होता.

आणखी वाचा : इंटिमेट सीन देण्यासाठी मला मुलीनेच प्रोत्साहन दिलं

विराट आणि अनुष्काने लग्नात बॉलिवूडमधील लोकप्रिय ड्रेस डिझायनर सभ्यसाचीने खास त्यांच्यासाठी डिझाइन केलेले ड्रेस परिधान केले होते. त्यांच्या कपड्यांचा खर्च जवळपास १ कोटी रुपये झाला. तसेच लग्नासाठी स्पेशल डिजे, ढोल आणि नगाड्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. सर्व गोष्टी पकडून विराट आणि अनुष्काच्या लग्नाचा एकूण खर्च १०० कोटी रुपये झाला असल्याचे म्हटले जात आहे.

विराटने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक रोमँटीक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने अनुष्कासोबतचा फोटो शेअर करत “केवळ प्रेम हे खरं असतं, इतर काहीही सत्य नसतं. त्यातच जेव्हा देवाच्या कृपेने प्रेम करणारा साथीदार आपल्याला लाभतो तेव्हा देवाचे आपण खुपच ऋणी असल्यासारखे वाटते” असे कॅप्शन दिले आहे.