Man vs Wild Modi Show : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग असलेला डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रम भाग आज (सोमावारी) प्रदर्शित होणार आहे. झळकणार आहेत. साहसवीर बेअर ग्रिल्सबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भटकताना दिसणार आहेत. मोदींसहभाग असणारा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ हा भाग आज (ऑगस्ट १२) रात्री नऊ वाजता ‘डिस्कव्हरी इंडिया’वर प्रकाशित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२९ जुलै रोजी बेअर ग्रिल्सने ट्विटवरुन टिझर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मध्ये दिसणार असल्याचे जाहीर केले होते. “जगभरातील १८० देशांच्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची या आधी कधीही न पाहिलेली बाजू पहायला मिळेल. प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि वातावरणातील बदलाकडे लक्ष्य वेधण्यासाठी मोदी भारतामधील जंगलांमधून फिरताना दिसतील,” असं तो या ट्विटमध्ये म्हणाला होता. पहिल्या टिझरमध्ये पंतप्रधान मोदी आणि बेअर ग्रिल्स जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामधील घनदाट जंगलामधून प्रवास करताना दिसले.

नक्की वाचा >> जाणून घ्या पंतप्रधान मोदींना जंगल सफर घडवणाऱ्या बेअर ग्रिल्सबद्दलच्या खास गोष्टी

नक्की वाचा >> “पुलवामामध्ये ४० जवान शहीद झाले, तेव्हा पंतप्रधान मोदी फिल्म शुटिंगमध्ये व्यस्त होते”

कुठे पाहता येणार कार्यक्रम

मोदींसहभाग असणारा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ हा भाग आज (ऑगस्ट १२) रात्री नऊ वाजता ‘डिस्कव्हरी इंडिया’वर प्रकाशित होणार आहे. केबल तसेच डिश टिव्ही असणाऱ्यांनाही आज रात्री हा कार्यक्रम टिव्हीवर पाहता येणार आहे. डिश टिव्ही असणाऱ्यांनी ‘डिस्कव्हरी इंडिया’ चॅनेलचे सबक्रिप्शन घेणे गरजेचे आहे. भारताबाहेर असणाऱ्यांनाही हा कार्यक्रम पाहता येणार आहे. चॅनेलचा हा भाग जागतिक स्तरावर प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. जगभरात हा विशेष भाग डिस्कव्हरीवर तर भारतात डिस्कवहरी इंडियावर पाहता येणार आहे.

नक्की वाचा >> मोदी ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मध्ये येणार ऐकून नेटकरी झाले सैराट, पाहा व्हायरल मिम्स

मोबाइल आणि ऑनलाइनवर कसा पाहता येणार कार्यक्रम

जर तुम्ही टाटास्काय किंवा अशाच एखादी सेवा सबक्राइब केली असील तर तुम्हाला तेथे डिस्कव्हरी चॅनेलच्या टॅबमध्ये हा भाग पाहता येईल. तसेच एअरटेल कनेक्शन असल्यास किंवा एअरटेल टिव्ही वापरत असल्यास तेथेही या कार्यक्रमाचे भाग पाहता येतील.

हा कार्यक्रम ऑनलाइन माध्यमातून कुठे पाहता येईल यासंदर्भात कोणताही माहिती देण्यात आली नसली तरी लवकरच हा भाग पंतप्रधान कार्यालयाच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन शेअर केला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांचा वापर करुन जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ मधील त्यांचा सहभाग हा प्राणी संवर्धनाचा संदेश देण्यासाठीचा असाच एक प्रयत्न आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How where to watch pm modi in man vs wild what time does it air today scsg
First published on: 12-08-2019 at 11:12 IST