News Flash

#HowdyModi : मोदींच्या भाषणावर ऋषी कपूर फिदा

नरेंद्र मोदींच्या अमेरिकी दौऱ्याचे कौतुक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. एक आठवड्याच्या या दौऱ्यात नरेंद्र मोदी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या निमित्ताने सोशल मीडियावर ‘हाउडी मोदी’ हा शब्द सध्या जोरदार ट्रेंड होत आहे. जगभरातून ‘हाउडी मोदी’ असे म्हणत मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यांत बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत. बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी देखील ‘हाउडी मोदी’ म्हणत नरेंद्र मोदींसाठी ट्विट केले आहे.

“आपल्या अस्तित्वाचा, आपल्या समाजाचा आणि आपल्या देशाचा मला अभिमान आहे” अशा आशयाचे ट्विट करुन ऋषी कपूर यांनी मोदींची स्तुती केली आहे. दरम्यान मोदींनी देखील त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रीया दिली आहे. “ऋषी कपूरजी तुमच्या उत्साहवर्धक प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. मी तुमच्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो.” असे ट्विट करुन मोदींनी प्रतिक्रीया दिली. याआधी अभिनेता सलमान खान व करण जौहर यांनीही ट्विट करुन नरेंद्र मोदींच्या अमेरिकी दौऱ्याचे कौतुक केले होते.

आणखी वाचा : बिग बींचं मराठी ट्विट; ‘या’ एका कारणामुळे अनेकांची स्वप्न राहतात अपूर्ण

आपल्या बिनधास्त प्रतिक्रीयांसाठी ओळखले जाणारे ऋषी कपूर नुकतेच न्यूयॉर्कहून भारतात परतले आहेत. गेले ११ महिने न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर कर्करोगाचा उपचार सुरू होता. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांशी संपर्कात होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 1:02 pm

Web Title: howdymodi narendra modi rishi kapoor mppg 94
Next Stories
1 Video: दीपिकाचा ड्रेस पाहून सलमाननं दिलेली प्रतिक्रिया बघाच!
2 बिग बींचं मराठी ट्विट; ‘या’ एका कारणामुळे अनेकांची स्वप्न राहतात अपूर्ण
3 सोनाक्षी सिन्हा ही ‘धन पशू’, युपीच्या मंत्र्याचं वक्तव्य
Just Now!
X