News Flash

काकांनी मांडला तिच्या स्वयंवराचा डाव..

आपल्या पोश्टर गर्लसाठी तिला साजेसा ‘वर’ वरण्याच्या तयारीला तिचे काका लागलेत

पारगाव टेकवडे…एक विचित्र आणि विक्षिप्त गाव… अशा या गावात आलीये एक ‘फटाकडी’…पारगाव टेकवडेत या ‘पोश्टर गर्ल’ने एन्ट्री घेतली आणि काकांची पंचाईत झाली…घराण्यात एकुलतं एक कन्यारत्न हे ऐकीवात होते पण अख्या गावात एकूलती एक ही वायकॉम १८ मोशन पिक्चर्सची ‘पोश्टर गर्ल’… या गावात सगळेचं बोहल्यावर चढायला एका पायावर तयार…पण ‘पोश्टर गर्ल’ला साजेसा ‘वर’ कसा शोधायचा यासाठी काकांनी आपल्या पोश्टर गर्लचं स्वयंवर करायचा निर्णय घेतला आहे. आपल्या पोश्टर गर्लसाठी तिला साजेसा ‘वर’ वरण्याच्या तयारीला तिचे काका लागलेत. त्यांनी गावातल्या तरूणांची लिस्ट शॉर्टलिस्ट करायला घेतली आहे. पोश्टर गर्लची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलणार हे जबाबदार व्यक्तीमत्त्व आहे ह्रषिकेश जोशी…’पोश्टर बॉईज्’, ‘यल्लो’, ‘आंधिळी कोशिंबीर’ अशा काही दर्जेदार सिनेमांमधून आपल्या अभिनयाची जादू मराठी मनावर करणाऱ्या या अभिनेत्याचा हा अजून एक दर्जेदार परफॉर्मन्स…
तर अशा…या ‘पोश्टर गर्ल’च्या काकांनी शॉर्टलिस्ट केलेले लग्नासाठी अनुरूप उमेदवार हळूहळू आपल्या समोर येतीलचं….पण पोश्टर गर्लच्या हातातली माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार, हे कळण्यासाठी…थोडी वाट नक्कीचं पहावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2016 12:35 pm

Web Title: hrishikesh joshi in poshter girl
Next Stories
1 श्रद्धा कपूर स्टंट्स करते तेव्हा..
2 ‘मस्तीजादे’च्या चित्रीकरणात आक्षेपार्ह असं काहीच नाही- सनी लिओनी
3 स्वप्नील-सचितची ‘फ्रेण्डशीप’
Just Now!
X