16 December 2017

News Flash

हृतिक-करण जोहरची फरहानसोबत जंगी पार्टी

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मैत्रीची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. कंगनाने केलेल्या आरोपांवर आपली बाजू मांडण्यासाठी अभिनेता

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 11, 2017 5:25 PM

फरहान अख्तर, हृतिक रोशन, करण जोहर

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मैत्रीची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. कंगनाने केलेल्या आरोपांवर आपली बाजू मांडण्यासाठी अभिनेता हृतिक रोशनने वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिली. या मुलाखतीनंतर फरहान अख्तर, करण जोहर, अदिती राव हैदरी या सर्वांनी मिळून हृतिकची साथ दिली. फरहानने नुकतेच त्याच्या घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला फरहानचे जिवलग मित्र करण जोहर आणि हृतिक या पार्टीला पोहोचले. करणने सोशल मीडियावर या पार्टीचा फोटो शेअर केला आहे.

हृतिक-कंगनाच्या वादानंतर फरहानने आता अचानक पार्टीचे आयोजन का केले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या पार्टीमागे एक वेगळेच कारण आहे. फरहान नुकताच त्याच्या पाली हिल येथील नवीन घरात राहण्यास गेला आहे. त्यानिमित्ताने जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी त्याने पार्टीचे आयोजन केले. करणने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘वर्षानुवर्ष चालत आलेला मैत्रीचा प्रवास!’ या फोटोमध्ये हृतिक रोशन आणि करण झोया अख्तरसोबत पाहायला मिळत आहेत.

Years of friendship…. @hrithikroshan @putlu @zoieakhtar

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

वाचा : नवज्योत सिंग सिद्धू यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

हृतिक आणि फरहान एकमेकांचे चांगले मित्र असून त्यांनी ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘डॉन २’, ‘लक्ष्य’ आणि ‘लक बाय चान्स’ या चित्रपटांसाठी एकत्र काम केले. कंगना-हृतिकच्या वादानंतर फरहानने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून हृतिकला साथ देत एक खुले पत्रदेखील लिहिले होते. या पत्रामध्ये त्याने कंगना रणौतवर सडकून टीका केली होती.

First Published on October 11, 2017 5:25 pm

Web Title: hrithik roshan and karan johar are celebrating with farhan akhtar