24 November 2020

News Flash

हृतिकने मुंबईमध्ये खरेदी केले दोन फ्लॅट, किंमत ऐकून बसेल धक्का

हे प्लॅट १५ आणि १६व्या मजल्यावर आहेत.

करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी सर्वचजण आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत होते. अभिनेता हृतिक रोशन देखील मुलांसोबत वेळ घालवत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने सोशल मीडियावर जुहू येथील घरातील मुलांसोबत वेळ घालवतानाचे फोटो शेअर केले होते. आता हृतिकने मुंबईमध्ये नवे घर घेतले असल्याचे समोर आले आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार हृतिक रोशनने मुंबईमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. हे प्लॅट १४, १५ आणि १६व्या मजल्यावर असून ३८ हजार स्क्वेअर फूट असल्याचे म्हटले जाते. या दोन फ्लॅटमधील एक फ्लॅट दोन मजल्यांचा असून एक पेंटहाऊस असल्याचे म्हटले जाते. हा फ्लॅट जुहू आणि वर्सोवा येथील लिंक रोडजवळ आहे. तसेच हृतिकच्या या नव्या फ्लॅटमधून समुद्र किनारा देखील दिसतो.

हृतिकच्या या फ्लॅटला पार्किंगसाठी मोठी जागा देण्यात आली आहे. जवळपास १० स्लॉट पार्किंगसाठी देण्यात आले आहेत. या बिल्डिंगचे नाव मन्नत असे आहे. तसेच हृतिकने हा प्लॅट ९७.५० कोटी रुपयांना खरेदी केला आहे. हृतिकने फ्लॅटसाठी ६७.५० कोटी रुपये दिले असल्याचे मुंबई मिररने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. तसेच उरलेली रक्कम हृतिक लवकरच भरणार असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 12:30 pm

Web Title: hrithik roshan buys two apartments in mumbai worth rs 97 crore avb 95
Next Stories
1 Bigg Boss 14 : “तुझ्या खेळात मला सामील करू नकोस”; सलमानचा रुबिनाला इशारा
2 मी केवळ व्हिसा मिळवण्यासाठी लग्न केलं; राधिका आपटेचा खुलासा
3 लस्ट स्टोरीजमधील ‘व्हायब्रेटर सीन’वर कियाराने दिली प्रतिक्रिया, म्हणाली..
Just Now!
X