अभिनेता हृतिक रोशन याने सायबर पोलिसांकडे केलेल्या तक्रोरीवरून नोंद गुन्ह्य़ाचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे वर्ग करण्यात आला. या वृत्तास मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला. २०१६ मध्ये हृतिकच्या नावाचा वापर करून बनावट ईमेल खाते तयार करून त्याद्वारे अभिनेत्री कं गना राणावतशी संवाद साधण्यात आल्याची  तक्रा र हृतिकने दाखल के ली होती. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. या घडामोडीनंतर हृतिक आणि कंगना यांनी एकमेकांविरोधात बऱ्याच तक्रोरी दाखल केल्या. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप घडले. अलिकडेच हृतिकच्या वकिलांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास पुढे न्यावा, अशी विनंती केली होती.