हृतिक रोशन हा बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. स्टायलिश लूक, अनोखी नृत्यशैली आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. आजवर त्याला मिळालेल्या यशाचं मोठं श्रेय तो ‘धुम २’ या चित्रपटाला देतो. या चित्रपटानं त्याला खऱ्या अर्थानं लोकप्रिय केलं. स्टायलिश होणं म्हणजे काय? हे त्याला ‘धुम २’ या चित्रपटानं शिकवलं.

अवश्य पाहा – ‘नग्न असताना मला अधिक आध्यात्मिक वाटतं’; टीकाकारांवर सोफिया संतापली

‘धूम २’ हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. जबरदस्त अॅक्शन सीन, बाईक स्टंट, आणि हृतिक रोशन, ऐश्वर्या राय यांचा ग्लॅमरस अंदाज यामुळे ‘धुम २’ सुपरहिट ठरला होता. २००६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज तब्बल १४ वर्ष पुर्ण झाली आहेत. या निमित्तानं हृतिकने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.

अवश्य पाहा – ‘तुरुंगातून सुटताच सूड घेईन’; अभिनेत्रीला मिळाली जीवे मारण्याची धमकी

अवश्य पाहा – अंडरटेकर बनून ‘या’ अभिनेत्यानं केली होती अक्षय कुमारसोबत फाईट

“धूम २ हा माझ्यासाठी एक प्रेरणादायी चित्रपट होता. स्टायलिश होणं म्हणजे काय? हे मला या चित्रपटानं शिकवलं. या चित्रपटात मी जवळपास १५ वेगवेगळ्या लूकमध्ये काम केलं. प्रत्येक वेळी मला लूकच्या हिशोबानं अभिनय करावा लागत होता. अर्थात यासाठी मला माझ्या सहकलाकारांनी खूप मदत केली. धूम २ या चित्रपटानं मला अविस्मरणीय अनुभव दिले. आज मी जे यश संपादित केलंय त्यामागे या चित्रपटाचा मोठा वाटा आहे.” अशा आशयाची पोस्ट लिहून हृतिकने आपला अनुभव चाहत्यांना सांगितला आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.