‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून नावारुपाला आलेला अभिनेता ऋतिक रोशन गेल्या काही दिवसापासून त्याच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या चर्चांकडे दुर्लक्ष करुन त्याने त्याच्या करिअरकडे लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे. ऋतिक लवकरच ‘सुपर ३०’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच संपल्यामुळे ऋतिक एका वेगळ्याच मूडमध्ये असल्याचं दिसून येत आहे.

ऋतिकने ‘आशा’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो हळूहळू यशाची पायरी चढू लागला. यशाची ही पायरी सर करत असतानाच ऋतिकच्या जीवनात अनेक चढउतार आले. मात्र त्यातून तो सावरल्याचं दिसून येत आहे. याचंच उदाहरण म्हणजे तो लवकरच ‘सुपर ३०’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

बॉलिवूडमध्ये आपलं नाव ‘रोशन’ करणाऱ्या ऋतिकने त्याच्या अभिनयापेक्षा नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे तो पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकायच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. ‘सुपर ३०’ चं राजस्थानमधील चित्रीकरण पूर्ण झालं असून यानिमित्त एका सरप्राईज पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये ऋतिकने चक्क भोजपुरी गाणं ‘लॉलीपॉप लागेलू’ या गाण्यावर डान्स केला आहे.

गेल्या काही दिवसापासून ऋतिक ‘सुपर ३०’ चित्रीकरणामध्ये व्यस्त होता. मात्र या गाण्यावर थिरकल्यानंतर तो आता रिलॅक्स मुडमध्ये असल्याचं दिसून येत आहे. ऋतिकचा हा ‘सूपर ३०’ हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून ऋतिकला पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर झाले आहेत.