29 September 2020

News Flash

प्रियांका, दीपिकानंतर हृतिकचे हॉलिवूडमध्ये पदार्पण?

कॅलिफोर्नियामधील एका एजंसीने हृतिकला साइन केले असल्याचे म्हटले जात आहे

बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ एक असे सलग दोन हीट चित्रपट देणारा अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. हृतिकच्या ‘वॉर’ आणि ‘सुपर ३०’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता हृतिक लवकरच हॉलिवूड चित्रपटामध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि दीपिकानंतर हृतिक हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. कॅलिफोर्नियामधील एका एजंसीने हृतिकला साइन केले असल्याचे म्हटले जात आहे. या एजन्सीचे नाव Gersh Agency असे आहे. या कंपनीच्या मॅनेजर अमृता सेन भारतातील KWAN कंपनीसोबत काम करत आहे.

 

View this post on Instagram

 

. मैं और मेरी तन्हाई अक्सर यह बातें करती हैं. की आज यह Abs होते तो कैसा होता।. . अगर यह होते तो ऐसा होता, अगर यह होते तो वैसा होता ।. जबकि मुझे ख़बर है की ABS नही हैं… कहीं नहीं हैं।. . लेकिन यह पागल दिल है की कह रहा हैं की वो हैं .. मोटे पेट के नीचे कहीं हैं…। . मैं और मेरी तन्हाई अक्सर यह बातें करती हैं ! . . Thanks dabs for this amazing shot ! #missingthedays @dabbooratnani @manishadratnani #dabbooratnanicalendar

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

आंतरराष्ट्रीय पोर्टल डेडलाइनने दिलेल्या वृत्तानुसार ‘हृतिक खूप मेहनती आहे. गेल्या २० वर्षांपासून तो भारतीय चित्रपटसृष्टीला एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराता भारतीय चित्रपटसृष्टीला आग्रस्थानी नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत’ असे अमृता म्हणाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी हृतिकचा ‘वॉर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता लवकरच त्याचा क्रिश ४ येणार आहे. २०१९ हे वर्ष हृतिकसाठी खास ठरले आहे. त्याच्या वॉर आणि सुपर ३० या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता हृतिकला हॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 5:20 pm

Web Title: hrithik roshan has plans for hollywood signed by us agency gersh avb 95
Next Stories
1 अतिउत्साह नडला; नाचता नाचता ‘या’ हॉट अभिनेत्रीचा पाय मोडला
2 पॉर्नस्टार होताच दिग्दर्शकाच्या मुलीला पोलिसांनी केली अटक
3 पहिल्यांदाच जेम्स बॉन्ड बोलणार मराठी
Just Now!
X