News Flash

‘मोहंजो दडो’च्या शुटिंगसाठी हृतिक रोशन भुजमध्ये

'मोहंजो दडो'या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन भुजमध्ये दाखल झाला आहे.

| January 27, 2015 12:43 pm

‘मोहंजो दडो’या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन भुजमध्ये दाखल झाला आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहंजो दडो’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा हृतिक याआधी मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बँग बँग’ चित्रपटात दिसला होता. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि हृतिक रोशन ही जोडी ‘मोहंजो दडो’ चित्रपटाद्वारे दुसऱ्यांदा एकत्र येत असून, याआधी ‘जोधा अकबर’ हा सुपरहीट चित्रपट या दोघांनी एकत्र केला होता. ‘जोधा अकबर’ चित्रपटात हृतिकने बादशहा अकबरची मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. २०१६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘मोहंजो दडो’ चित्रपटाद्वारे अभिनेत्री पूजा हेगडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. आजपासून या चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरुवात होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2015 12:43 pm

Web Title: hrithik roshan in bhuj to start shooting for mohejo daro
Next Stories
1 रणबीर कपूर कतरिनाला भेटू शकणार नाही
2 मी ‘भारतरत्न’च्या योग्यतेचा नाही, अमिताभ यांचे ममता बॅनर्जींना उत्तर
3 ओबामांच्या भाषणातील उल्लेखाने शाहरुख कृतकृत्य
Just Now!
X