News Flash

VIDEO : “ही तर सुपरस्टार”; चिमुकलीचा डान्स पाहून हृतिकही झाला थक्क

हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल...

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन अफलातून अभिनयासोबतच आपल्या जबरदस्त डान्स शैलीसाठी ओळखला जातो. त्याच्या डान्सचे सर्वत्र कौतुक केले जाते. अनेकांनी हृतिकपासून प्रेरणा घेत डान्स करायला सुरुवात केल्याचे किस्से आपण ऐकले आहेत. मात्र इतरांना प्रेरणा देणारा हृतिक एका लहान मुलीचा डान्स पाहून थक्क झालाय.

हृतिकने या मुलीचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमधील मुलगी ‘वॉर’ चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अगदी सहजरित्या ती हुबेहुब हृतिकसारखा डान्स करताना दिसतेय. हा डान्स पाहून स्वत: हृतिक देखील थक्क झाला. “ही तर स्टार आहे.” असं म्हणत त्याने तिचं कौतुक केलंय.

हृतिक रोशनने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाख ३८ हजारांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. ही लहान मुलगी रातोरात सुपरस्टार झाल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 3:37 pm

Web Title: hrithik roshan is impressed with this little girl dancing mppg 94
Next Stories
1 भारतीय खेळाडूंनी माफी मागावी असं म्हणणाऱ्या स्वरा भास्करला सॅमीचं उत्तर, म्हणाला…
2 अभिषेकचा डिजिटल डेब्यु; ‘या’ सीरिजमध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
3 मिलिंद सोमणने घरच्या घरीच पिकवल्या फळभाज्या; पाहा टेरेस गार्डनिंगचे फोटो
Just Now!
X