अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रणौत यांच्यामधील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. हृतिक आणि कंगना हे दोघेही सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप करत आहेत. एकीकडे हृतिक आपला कंगनाशी काहीच संबंध नसल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे कंगना ह्रतिक खोटं बोलत असल्याचा दावा करतेय. मात्र सध्या हृतिक आणि कंगनाचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘क्रिश थ्री’चे शूटींग संपल्यानंतरच्या पार्टीतील हा फोटो असल्याचे कळते. ह्रतिकने कंगनाला प्रेमाने जवळ ओढत असतानाचा हा फोटो आहे. या फोटोच्या आधारावर दोघे रिलेशनशिपमध्ये होते की नव्हते ? हे सांगणे कठीण आहे. पण या फोटोमुळे या दोघांमधील प्रकरणाला नवे वळण मिळू शकते.
कंगनाने हृतिकचा ‘सिली एक्स’ असा असा उल्लेख केल्यानंतर या दोघांमध्ये कायदेशीर लढाईला सुरुवात झाली.