News Flash

हृतिकने घेतली अ‍ॅक्शन स्टार ‘जॅकी चॅन’ यांची भेट

गेल्या काही वर्षांपासून भारतीय चित्रपटांची चिनी बॉक्स ऑफिसवर चलती पाहायला मिळतेय

जॅकी चॅन,हृतिक रोशन

गेल्या काही वर्षांपासून भारतीय चित्रपटांची चिनी बॉक्स ऑफिसवर चलती पाहायला मिळतेय. ५ जूनला हृतिकचा ‘काबिल’ चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. चीनमध्ये ‘काबिल’च्या प्रमोशनसाठी सध्या हृतिक चीनमध्ये गेला आहे. प्रमोशन दरम्यान हृतिकने दिग्गज अभिनेता ‘जॅकी चॅन’ यांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो हृतिकने शेअर केले आहेत.

हृतिकने हे फोटो त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केले आहेत. ‘जॅकी चॅन यांना भेटण्याचा अनुभव खूप विलक्षण होता.त्यांना भेटून उत्साहपूर्ण वाटतंय. ते माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत.’ असे हृतिकने म्हटले आहे. या फोटोंसोबतच हृतिकने ‘आय लव्ह चायना’ असा हॅशटॅगही वापरला आहे.

चीनमध्ये हृतिकचे अनेक चाहते आहेत. चिनी प्रेक्षकांनी हृतिकला प्रेमाने एक नवीन नाव सुद्धा दिले आहे. सिनो लॅण्ड येथील चाहत्यांनी ह्रतिकला ‘दा शुई’ असे नाव दिले आहे. मॅंडरिन भाषेत याचा अर्थ ‘अतिशय देखणा’ असा होतो.

‘काबिल’ चित्रपट हा एक क्राइम थ्रिलर आहे. या चित्रपटात हृतिकसोबत यामी गौतमी सुद्धा आहे. या चित्रपटाची निर्मिती राकेश रोशन यांनी केली असून दिग्दर्शन संजय गुप्ताने केले आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०१७मध्ये भारतात प्रदर्शित झाला होता. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

सध्या हृतिक ‘सुपर ३०’ या चित्रपटाच्या प्रदर्शनात व्यस्त आहे. ‘सुपर ३०’ हा आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 3:25 pm

Web Title: hrithik roshan meet jackie chan
Next Stories
1 ..म्हणून ‘आशिकी’च्या पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे झाकले, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
2 Bigg Boss Marathi 2 : महेश मांजरेकर यांच्यासोबत रंगणार WEEKEND चा डाव
3 मेजर डी.पी.सिंह यांनी २० वर्षांनी पाहिला ‘सरफरोश’, आमिर झाला भावूक
Just Now!
X