‘पद्मावत’च्या दमदार यशानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी लवकरच आणखी एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटात भन्साळी यांनी त्यांचा आवडता अभिनेता रणवीर सिंगच्या ऐवजी हृतिक रोशनच्या नावाचा विचार केला आहे. ‘पुलिमुरुगं’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा हा रिमेक असणार आहे. मात्र हा चित्रपट हृतिकने नाकारल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत होत्या.

दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलालची मुख्य भूमिका असलेला ‘पुलिमुरुगं’ हा चित्रपट खूप गाजला होता. काही कारणास्तव हृतिकने तो नाकारल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचं त्याने नुकतंच स्पष्ट केलं आहे. ‘ही खोटी पत्रकारिता आहे कि प्रामाणिक चूक, हे कोणाला कधी कळणार आहे,’ असं ट्विट त्याने केलं आहे. यासोबतच ऑफर नाकारल्याची एक बातमीसुद्धा त्याने शेअर केली आहे. त्यामुळे या सर्व अफवांवर त्याने पूर्णविराम दिला आहे असंच म्हणावं लागेल.

Prassthanam : ‘हक दोगे तो रामायण शुरू होगी, छिनोगी तो महाभारत!’

हृतिकनं भन्साळींच्या ‘गुजारिश’ सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. तुर्तास या चित्रपटाचं नाव ‘प्रिन्स’ असं निश्चित करण्यात आल्याचं समजत आहे. अर्थात नावावरून या चित्रपटात हृतिक एखादी ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे.