News Flash

हृतिकच्या डोकेदुखीने पुन्हा डोकं वर काढलं

'क्रीश ३'नंतर ह्रतिकच्या डोकेदुखीने पुन्हा डोकं वर काढलं आहे.

| November 22, 2013 06:55 am

काही महिन्यांपूर्वीच हृतिकच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण आता ‘क्रीश ३’नंतर ह्रतिकच्या डोकेदुखीने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे ह्रतिकच्या आगामी ‘शुद्धी’ आणि ‘बँग बँग’चे चित्रीकरण तब्बल सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हृतिक म्हणाला की, सर्व लोकांनी क्रिश ३ ला जे प्रेम दिले आहे त्यामुळे मी खूप खूश आहे. जानेवारी २०१४ला ‘बँग बँग’ आणि त्यानंतर ‘शुद्धि’च्या चित्रीकरणास सुरुवात करण्यापूर्वी मी काही दिवसांची सुट्टी घेणार आहे. जेणेकरून, गेल्या काही आठवड्यांपासून होत असलेल्या डोकेदुखीपासून मला आराम मिळेल. मला विश्वास आहे की, तुमच्या प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी पूर्णपणे बरा होईन. मी प्रार्थना करेन की, तुम्हा सर्वांना २०१३चा शेवट आणि २०१४ची सुरुवात खूप चांगली होवो.
हृतिक ‘बँग बँग’मध्ये कतरिना तर ‘शुद्धि’मध्ये करीना कपूरसोबत दिसणार आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 6:55 am

Web Title: hrithik roshan postpones bang bang shuddhi shoot to recover completely
टॅग : Hrithik Roshan
Next Stories
1 ‘केबीसी’ फायनलला बीगबींचा ‘डबल धमाका’?
2 पाहाः रणवीर-अर्जुनच्या ‘गुंडे’चा ट्रेलर
3 माधुरी-जुही चावलाच्या ‘गुलाब गॅंग’ला ७ मार्चचा मुहूर्त