News Flash

महिलांच्या ‘लस्ट स्टोरी’बाबत काय म्हणतोय हृतिक?

महिला हस्तमैथुनाविषयीच्या त्या व्हिडिओवर हृतिक रोशनने दिली प्रतिक्रिया

हृतिक रोशन

भारतीय समाजातील स्त्रियांच्या भावना टिपण्याचा प्रयत्न करणारी ‘लस्ट स्टोरीज’ ही वेब सीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्त्री ही केवळ एक भोगवस्तू नाही तर तिला स्वत:च्या भावना आहेत, तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तिला स्वत:च्या म्हणून कामभावनादेखील आहेत, आणि त्या पूर्ण करणं ही तिची गरज आहे, चित्रपटातून संदेश वगैरे घ्यायचा म्हटलं तर असं काही तरी लिहिता येईल. यातलाच एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टँडअप कॉमेडियन सुमुखी सुरेश ‘masturbation manual for women’ (महिलांसाठी हस्तमैथुन करण्याविषयीचं मार्गदर्शन) विनोदी पद्धतीने या व्हिडिओमध्ये सांगत आहे.

महिलांना हस्तमैथुनासाठी प्रेरित करणारा म्हणून हृतिक रोशनचा या व्हिडिओमध्ये उल्लेख आहे. एका ट्विटर युजरने या व्हिडिओच्या ट्विटमध्ये हृतिकलाही टॅग केलं आणि तू हा व्हिडिओ पाहिलास का असा प्रश्न विचारला. त्यावर आता हृतिकने उत्तर दिलं आहे.  ‘होय, मी हा व्हिडिओ पाहिला. हे थोडंसं लाजिरवाणं आहे पण तितकंच प्रशंसनीय आहे. ही माझी प्रामाणिक प्रतिक्रिया आहे,’ असं  ट्विट हृतिकने केलं.

#MazyaNavryachiBayko : राधिकाने विकत घेतली ३०० कोटींची कंपनी; सोशल मीडियावर भन्नाट विनोद व्हायरल

स्त्रीलादेखील कामभावना आहे, तिची स्वतंत्र प्रतिमा आहे, हे मान्य करायचे तरी चाकोरीतून रचलेले पायंडे, ठोकताळे मात्र सुटत नाहीत. हा तिढा आजही समाजात दिसून येतो. हा विरोधाभास या वेब सीरिजच्या चारही कथांमध्ये टिपला गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 7:12 pm

Web Title: hrithik roshan reacts to being masturbation inspiration for women after viral video
Next Stories
1 Video : वरुण-अनुष्का राष्ट्रध्वजाबद्दल काय म्हणाले ऐकलत का ?
2 #MazyaNavryachiBayko : राधिकाने विकत घेतली ३०० कोटींची कंपनी; सोशल मीडियावर भन्नाट विनोद व्हायरल
3 Video :रणवीरने शेअर केली ‘सिम्बा’च्या पडद्यामागील दृश्य
Just Now!
X