10 July 2020

News Flash

‘तान्हाजी’ चित्रपट पाहून हृतिक रोशन म्हणाला..

'तान्हाजी' चित्रपट पाहिल्यानंतर हृतिकने केले ट्विट

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटला तरी त्याची चर्चा अजूनही थांबलेली नाही. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं कौतुक प्रेक्षक-समीक्षकांकडून झालं. आता बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याने हा चित्रपट पाहिला आणि त्याची स्तुती करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. हृतिकने ट्विट करत अजय देवगण व संपूर्ण ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या टीमची वाहवा केली आहे.

‘आताच ‘तान्हाजी’ चित्रपट पाहिला. अतुलनीय चित्रपट आहे. सर्वोत्तम साहसदृश्ये पाहायला मिळाली. अजय देवगण व काजोल यांचं अभिनय पाहून त्यांना नमन करावंस वाटतंय. सैफ अली खाननेही उत्तम कामगिरी केली. संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांची जितकी स्तुती करावी ती कमीच आहे. नेहा शर्माचंही अभिनय दमदार होतं. अप्रतिम चित्रपट आहे’, अशा शब्दांत हृतिकने स्तुतीसुमने वाहिली.

हृतिकचे हे ट्विट पाहून अजयनेही आनंद व्यक्त केला. ‘तान्हाजी’ या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली असल्याचं त्याने सांगितलं.

पाहा व्हिडीओ : डॉ. अमोल कोल्हेंनी उलगडली मालिकेसोबत झालेल्या राजकारणाची गोष्ट

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने ३०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 12:31 pm

Web Title: hrithik roshan reviews ajay devgn tanhaji the unsung warrior ssv 92
Next Stories
1 Video : डॉ. अमोल कोल्हेंनी उलगडली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेसोबत झालेल्या राजकारणाची गोष्ट
2 कियारा आडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; फोटो व्हायरल
3 रोमी भाटिया की दीपिका? ’83’ मधील हा फोटो पाहून पडेल प्रश्न
Just Now!
X