News Flash

हृतिक रोशन आणि सैफ अली खान आमनेसामने

या चित्रपटात हृतिक कुख्यात गुन्हेगाराच्या भूमिकेत दिसणार आहे

‘वॉर’ चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यात अ‍ॅक्शनची जुगलबंदी पाहायला मिळाली होती. हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला, तिकीटबारीवर या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला. आता पुन्हा एकदा हृतिक आणखी एका अभिनेत्याबरोबर अशीच जुगलबंदी करताना दिसणार आहे. या वेळी हृतिक अभिनेता सैफ अली खानबरोबर काम करणार असून इथेही ते दोघे एकमेकांबरोबर नव्हे तर आमनेसामने दिसणार आहेत. ‘विक्रम वेध’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये या दोन मोठय़ा कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

‘वॉर’च्या यशानंतर हृतिकने कु ठल्याही चित्रपटासाठी करार केल्याचे ऐकिवात नव्हते. करोना आणि टाळेबंदीमुळे वर्षभरात चित्रीकरणालाच फाटा मिळाला होता. त्यानंतरच्या काळात हृतिकने आपल्या ब्रँड आणि इतर जाहिरातींसाठी वेळ दिला होता, असे सांगितले जाते. त्यामुळे चित्रपटांपासून दूर असलेला हृतिक आता या उन्हाळ्यात नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे कळते. हा नवा चित्रपट कोणता? ते जाहीर झाले असून ‘विक्रम वेध’ हाच तो पहिला चित्रपट असणार आहे. या चित्रपटात हृतिक कुख्यात गुन्हेगाराच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सैफ अली खान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या पूर्वतयारीलाही सुरुवात झाली असून या भूमिके साठी हृतिकला मोठय़ा प्रमाणात वजन घटवावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याने कामही सुरू केले असल्याचे सांगितले जाते.

या मे महिन्याच्या सुमारास चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे. ‘विक्रम वेध’ या चित्रपटाबरोबर आणखीही काही चित्रपटांसाठी हृतिक करारबद्ध आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणबरोबर तो ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘हॉटस्टार’वरच्या एका कार्यक्रमासाठीही तो करारबद्ध आहे. शिवाय, वडील राकेश रोशन यांच्या ‘क्रिश ४’ चित्रपटाच्या चित्रीकरणालाही तो याच वर्षी सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 12:10 am

Web Title: hrithik roshan saif ali khan in hindi remake of the southern film vikram vedha zws 70
Next Stories
1 Picasso Movie Review : आनंदाचा झरा
2 पुन्हा भयघंटा..
3 अक्षय कुमारचा ‘अतरंगी’ अवतार; जादूगाराच्या लूकमधला फोटो केला शेअर
Just Now!
X