29 November 2020

News Flash

असे दिसते हृतिकचे हृदय; त्यानेच शेअर केला फोटो

माझ्या हृदयाचा आकार.. आपण किती संवेदनशील असतो..

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सोशल मीडियाव्दारे नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अलिकडेच त्याने आपल्या हृदयाचा फोटो इन्स्टग्रामवर शेअर केला आहे. “हे आहे माझे हृदय” असे म्हणत शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते आहे.

“माझ्या हृदयाचा आकार.. आपण किती संवेदनशील असतो.. इतरांकडून प्रेम मिळावं यासाठी नकळत आपण आपलं अर्ध आयुष्य घालवतो. किंबहुना हे करण्याची गरजच नसते. आपण सर्व सारखेच आहोत हे किती सहजरित्या आपण विसरतो.” अशा शब्दात हृतिकने आपल्या हृदयाची स्तुती केली आहे.

हृतिकने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काही तासात शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री दिया मिर्झाने हिने “हृतिकचे हृदय किती सुंदर आहे” असे म्हणत या फोटोची स्तुती केली. तसेच प्रिती झिंटा हिने देखील टाळ्या वाजवून या फोटोचे कौतुक केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 1:11 pm

Web Title: hrithik roshan shares a picture of his heart mppg 94
Next Stories
1 …अन् सुनिल शेट्टीने खेचून घेतला चाहत्याचा मोबाईल
2 ‘कल हो ना हो’मधील बालकलाकार आता असा दिसतो, पाहा फोटो..
3 प्रसिद्ध अभिनेत्याला ३३व्या वर्षीच करावी लागली आजोबाची भूमिका
Just Now!
X