News Flash

हृतिकच्या बहिणीला मानसिक आजार?, जाणून घ्या सत्य..

सुनैना रोशनला रुग्णालयात दाखल केल्याच्या सोशल मीडियावर चर्चा

हृतिक रोशन व त्याची बहीण सुनैना रोशन

अभिनेता हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन ही दुभंगलेलं व्यक्तीमत्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने ग्रस्त असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या जोरदार चर्चा गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत्या. एका वेबसाइटने सुनैना आजारी असल्याचं वृत्त दिल्यानंतर या चर्चांनी जोर धरला होता. तिला २४ तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवल्याचंही म्हटलं जात होतं. या सर्व चर्चांवर स्वत: सुनैनाने स्पष्टीकरण दिलं आहे.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तिने मानसिक आजारग्रस्त असल्याचे वृत्त फेटाळले आहे. ‘मला खरंच माहीत नाही की अशा अफवा कोण पसरवतंय पण ज्यांना मला तब्येतीची खरंच काळजी आहे त्यांची मी आभारी आहे. मी कोणत्याच रुग्णालयात दाखल नाही किंवा माझ्यावर कोणत्याही मानसिक आजारावरील उपचारसुद्धा सुरू नाही. खरंतर माझ्यावर कोणत्याही आजारावरील उपचार सुरू नाहीत. मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करत होती.’

एकेकाळी सुनैना कॅन्सरग्रस्त होती. मात्र उपचारानंतर ती पूर्णपणे बरी झाली. त्यानंतर तिने बॅरिअॅट्रीक सर्जरी करत ७० किलो वजनदेखील घटवलं होतं. आता मानसिक आजार असल्याच्या चर्चांवर ती पुढे म्हणाली, ‘तापट स्वभाव असण्याचा अर्थ तुम्हाला दुभंगलेल्या व्यक्तीमत्त्वाचा मानसिक आजार आहे असा होत नाही. शारीरिक व मानसिकरित्या मी एकदम फिट आहे.’

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2019 1:52 pm

Web Title: hrithik roshan sister sunaina roshan clarifies i am not bipolar nor am i under any medication ssv 92
Next Stories
1 शिक्षणावरुन ट्रोल केल्यानंतर अर्जुनने अनन्याला दिला ‘हा’ सल्ला
2 ‘रंग दे बसंती’ चित्रपटाला नकार दिल्याचा शाहिदला आता होतोय पश्चात्ताप
3 बिग बी यांच्या नातीसोबतच्या नात्याबाबत मिजान जाफरीने केला खुलासा
Just Now!
X