06 July 2020

News Flash

ठरलं! हृतिकचा सुपर ३० ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला

याआधी 'सुपर ३०' चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता

गेल्या काही दिवसापासून बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’ हा चित्रपट वादात सापडला आहे. त्यातच हृतिक आणि कंगनाचा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार होता. परंतु हृतिकने नमते घेत प्रदर्शनाची तारीख बदलण्यास सांगितली होती. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख अधिकृतपणे घोषीत करण्यात आली आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे ‘सुपर ३०’ या चित्रपटाची तारिख सांगितली आहे. ‘सुपर ३० चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख ठरली. १२ जुलै २०१९’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. याआधी सुपर ३० चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु त्याच दिवशी कंगनाचा ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समोर होते. त्यामुळे हृतिकने चित्रपट निर्मात्यांना ‘सुपर ३०’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यास सांगितले होते. त्यासाठी हृतिकने ट्विटरवर एक पोस्ट लिहीली होती.

‘मला माझ्या चित्रपटावर कोणत्याही माध्यमांच्या चर्चांचा प्रभाव पडू द्यायचा नाही. मी स्वत:ला मानसिक त्रास आणि छळापासून दूर ठेवण्यासाठी माझ्या सुपर ३० चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा विचार केला आहे. चित्रपट प्रदर्शनाच सज्ज झाला असला तरी मी चित्रपट निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख बदलून नवी तारीख घोषीत करण्याची विनंती करतो’ असे हृतिकने पोस्टमध्ये लिहिले होते.

‘सुपर ३०’ हा आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. आनंद कुमार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात याव्यात असे दिग्दर्शक विकास बहल यांना वाटत होते. त्यामुळे ऐनवेळी काही दृश्य चित्रपटात घेण्यात आली आहे त्यामुळे चित्रपटाला उशीर झाला होता. हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचे देखील तेव्हा म्हटले जात होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2019 10:50 am

Web Title: hrithik roshan super 30 is going to release on 12 july 2019
Next Stories
1 अभूतपूर्व कलाकृती!
2 कुणाचे काय, अन्..
3 यदा कदाचित रिटर्न्‍स पवारांची चटकदार भेळ
Just Now!
X