News Flash

हे आहेत हृतिकच्या आयुष्यातील ‘सुपर टीचर्स’

सध्या हृतिक मृणाल ठाकूरसोबत आगामी 'सुपर ३०' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

हृतिक रोशन

बॉलिवूडमधील कलाकार कायमच त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी व्यक्तींविषयी सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतंच हृतिक रोशननेदेखील त्याला प्रेरणा देणाऱ्या दोन व्यक्तींविषयी पोस्ट लिहिली आहे. त्याचे आजोबा आणि स्पीच थेरपिस्ट याना त्याने ‘सुपर टीचर्स’ म्हटले आहे.

सध्या हृतिक मृणाल ठाकूरसोबत आगामी ‘सुपर ३०’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो स्वतः शिक्षकाची भूमिका साकारणारा आहे. ट्विटरवर त्याने त्याच्या आयुष्यातील दोन प्रेरणादायी शिक्षकांसाठी भावुक पोस्ट लिहिली आहे. त्याचे आजोबा आणि स्पीच थेरपिस्ट डॉ.ओझा यांचे त्याने आभार मानले आहेत.

त्याने हॅशटॅग ‘सुपर टीचर्स’ असे लिहीत पुढे म्हटले आहे की, ‘माझे आजोबा ज्यांना मी प्रेमाने ‘डेडा’ म्हणतो, त्यांनी मला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मौल्यवान गोष्टी शिकवल्या आहेत. ह्याच गोष्टी मी आता माझ्या मुलांना शिकवतो. मी लहान असताना माझे स्पीच थेरपिस्ट डॉ.ओझा यांनी मला माझ्यातला कमकुवत गोष्टी स्वीकारायला शिकवल्या. माझ्यात असलेल्या भीतीवर मात करायला शिकवलं.’ या ट्विटमध्येच त्याने दोन फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये हृतिक त्याच्या आजोबांसोबत गप्पा मारताना दिसतोय.

‘सुपर ३०’मध्ये कोणताही आधार नसलेली मुलंसुद्धा देशातील बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी झटणाऱ्या आनंद कुमार यांचा जीवनप्रवास या चित्रपटात दिसणार आहे. ‘रिलायन्स एन्टटेंन्मेंट आणि फँटम फिल्म्स’च्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून विकास बहल यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 4:58 pm

Web Title: hrithik roshan super teachers nana inspiration djj 97
Next Stories
1 अल्लू अर्जुनने घेतली सलमान-शाहरुखपेक्षाही महागडी व्हॅनिटी व्हॅन
2 दिशासोबत डिनर डेटला गेल्यावर बिल कोण भरतं? टायगर म्हणतो..
3 माझ्यासमोर उभं राहण्याची ताकद फक्त या अभिनेत्यामध्ये – हृतिक रोशन
Just Now!
X