News Flash

आदिवासी मुलींसाठी हृतिकची चॅरिटी

दहीहंडी सोहळ्यांमध्ये विविध ठिकाणी अनेक बॉलीवूड आणि टीव्ही कलाकारांनी वर्णी लावली होती.

| September 1, 2013 12:00 pm

दहीहंडी सोहळ्यांमध्ये विविध ठिकाणी अनेक बॉलीवूड आणि टीव्ही कलाकारांनी वर्णी लावली होती. मात्र, यामध्ये बॉलीवू़ड सुपरस्टार हृतिक केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या उद्देशाने न जाता आदिवासी मुलींसाठी निधी जमा करण्यासाठी गेला होता. हृतिकच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याला गजबजाटापासून दूर राहण्यास सांगितले होते. पण, नुकताच पार पडलेल्या दहीहंडीच्या उत्सवात जाण्यापासून हृतिक स्वतःला आवरु शकला नाही. कारण, घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवामध्ये एका स्वयंसेवी संस्थेअंतर्गत आदिवासी मुलींसाठी निधी गोळा करण्यात येणार होता.
हृतिक म्हणाला की, मला डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले असून अती गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला आहे. हे योग्य असले तरी तुम्ही जेव्हा कोणालाही प्रेम देता तेव्हा कोणतीच गोष्ट तुम्हाला हानी पोहचवत नाही. मला एकदम सुरक्षित वाटत होते. जेव्हा कोणीतरी इतरांसाठी काही चांगले करत असेल, तेव्हा त्यात सहभागी होणे आनंददायी असते. तसेच, हा कार्यक्रम सामाजिक कार्यासाठी होता त्यामुळे मी तिथे जाण्याचे ठरवले, असेही तो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2013 12:00 pm

Web Title: hrithik roshan supports charitable cause for tribal girls
Next Stories
1 आरोप जामीनपात्र असल्याचे कळताच ओम पुरी पोलिसांसमोर हजर
2 ‘बिग बॉस ७’ मधील स्पर्धकांची नावे
3 ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’चा २२ कोटींचा विक्रम ‘दुनियादारी’ मोडणार?
Just Now!
X