बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान यांच्या घटफोस्टावर शनिवारी शिक्कामोर्तब झाले. आज वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान ह्रतिक आणि सुझान यांच्या घटस्फोटाला मंजूरी देण्यात आली. मात्र, त्यांच्या दोन्ही मुलांचा ताबा  कुणाकडे देण्यात येईल, यासंबंधीची निर्णय न्यायालय काही दिवसांनी देणार असल्याचे समजते. दरम्यान, ह्रतिक रोशनकडून सुझानला देण्यात येणाऱ्या पोटगीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या घटस्फोटामुळे बॉलीवूडमधील एका प्रेमकहाणीचा करूण अंत झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan sussanne khan divorce finalized
First published on: 01-11-2014 at 12:35 IST