News Flash

PHOTOS: मुलांसोबत हृतिक-सुझानची दुबई सफर

हृतिक आणि सुझानची मैत्री आजही टिकून आहे.

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

कोणतेही नाते जोडले जाण्यासाठी कधीकधी फार वेळ लागतो. पण, तेच नाते दुभंगण्यासाठी फक्त एखादा क्षणही पुरेसा असतो. २०१६ या वर्षात याचा प्रत्यय अनेक सेलिब्रिटी जोडप्यांना आला असावा. बऱ्याच वर्षांपासून चालत आलेल्या वैवाहिक नात्यात ऊद्भवलेल्या काही प्रसंगांमुळे काही प्रसिद्ध बी टाऊन जोड्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. इशाच जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान. दोन वर्षांपूर्वी हृतिक आणि सुझानच्या वैवाहिक नात्यात दुरावा आल्यामुळे या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि अनेकांना त्यांच्या या निर्णयाने धक्काच बसला. पण, वैवाहिक नात्यात दुरावा आला असला तरीही हृतिक आणि सुझान त्यांच्यातील मैत्री आजही टिकून आहे. सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणारे त्यांचे फोटो तरी निदान हेच सिद्ध करत आहेत.

 

सुझान आणि हृतिक सध्या त्यांच्या दोन्ही मुलांसमवेत म्हणजेच रेहान आणि रिदानसमवेत दुबईला गेले आहेत. दुबईच्या सुरेख समुद्रकिनाऱ्यावरचा एक फोटो पाहिल्यावर अनेकांनी हृतिक आणि सुझान पुन्हा एकत्र येण्याच्या विचारात असल्याचा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. दरम्यान, सुझानच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोंचे कॅप्शन पाहता रोशन कुटुंबाची ही ‘परफेक्ट फॅमिली मोमेंट’ आहे असेच म्हणावे लागेल. विभक्त झाल्यानंतर हृतिक आणि सुझान एकत्र दिसण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यापासून दुसऱ्यांदा हृतिक आणि सुझानला एकत्र पाहिले गेले आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबईत या दोघांनाही त्यांच्या मुलांसोबत पाहिले गेले होते. त्यावेळीही सोशल मीडियावर विविध चर्चांना आलेले उधाण पाहता सुझानने हे स्पष्ट केले होते की, ‘मी जसे नेहमीच म्हणत आले आहे, हृतिक आणि मी सर्वात आधी दोन मुलांचे पालक आहोत. त्यामुळे त्यांच्या पालनपोषणासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. जेणेकरुन आमच्या मुलांचे चांगले संगोपन होईल. आमच्या दोघांतर्फेही मुलांनाच सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे आम्ही मुलांसोबत जेवण्यासाठी बाहेर गेलो याचा अर्थ असा नाही की आम्ही सुट्टीवर गेलो आहोत’, असे सुझान म्हणाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 12:46 pm

Web Title: hrithik roshan sussanne khan holiday with sons in dubai and the photos will give their fans hope see pics
Next Stories
1 अर्जुन कपूरला बृहन्मुंबई महानगरपालिकेची नोटीस
2 आठवणीतील सुपरस्टार: राजेश खन्ना यांच्याबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
3 नववर्ष संकल्प: ‘यावर्षी खूप झाडे लावणार’
Just Now!
X