अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com

हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि विद्युत जामवाल यांनी  पीळदार शरीरयष्टी, संवादफेक, फाईट्स आणि नृत्य याच्या जोरावर तरुणांना आपल्याकडे खेचले आहे. ‘क्रिश’, ‘बागी’ आणि ‘कमांडो’ या सिनेमा मालिकांमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला मिळविलेला आहे.

delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
sanjay-dutt-salman-khan
जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या

सध्या बॉलीवूडमध्ये पीळदार शरीरयष्टीच्या अभिनेत्यांना तरुण वर्गातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये आघाडीवर आहेत ते हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि विद्युत जामवाल. या अभिनेत्यांनी आपल्या बायसेप्स, ट्रायसेप्स, शोल्डर, अ‍ॅब्स, बॅक आणि हेअर स्टाईलने तरुणांना अक्षरश वेड लावले आहे. यांचे सिनेमे बाजारात दाखल होतात न् होतात, तोच तरुण वर्गाच्या त्यांच्यावर उडय़ा पडतात. जबरदस्त अ‍ॅक्शन, डोळे दिपविणारी नृत्ये आणि अफलातून गाणी यामुळे तरुण वर्ग त्यांच्या सिनेमांकडे खेचला जातो. गेल्या काही वर्षांत या अभिनेत्यांच्या सिनेमांच्या मालिकांमुळे मोठा तरुण यांच्याकडे आकर्षित झालेला दिसून येत आहे.

आपले पीळदार शरीर दाखवत हृतिकने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याने ‘क्रिश’सारख्या सिनेमातून आपल्या उठावदार ट्रायसेप्स, बायसेप्स आणि अ‍ॅब्समधून पीळदार शरीरयष्टीचा वेगळाच पायंडा पाडला. त्याच साच्यातून आत्ताचे टायगर श्रॉफ आणि विद्युत जामवाल पुढे आले आहेत. विशेष म्हणजे या तिघांच्या सिनेमांच्या मालिका तरुण प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. त्यात ‘क्रिश’ सिनेमाचे तीन भाग, ‘बागी’चे दोन भाग आणि ‘कमांडो’चे दोन भाग बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करणारे ठरले. त्यामुळे टायगरचा ‘बागी थ्री’ आणि विद्युतचा ‘कमांडो थ्री’ प्रेक्षकांची मने किती जिंकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या सिनेमांची चर्चा मात्र सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.

नुकत्याच येऊन गेलेल्या ‘वॉर’ चित्रपटातून हृतिक आणि टायगर एकाच पडद्यावर सर्वाना दिसले. हा जबरदस्त अ‍ॅक्शनपट ५० दिवसांपेक्षाही जास्त काळ सिनेमागृहात टिकून राहिला आणि त्याने भरघोस कमाई केली. हृतिकच्या अभिनयाइतकाच लोकांना टायगरचा अभिनयही आवडला. यापूर्वी ‘बागी’ सिनेमाच्या दोन्ही भागांतून टायगरने आपले चाहते (खास करून तरुण वर्ग) मोठय़ा प्रमाणात निर्माण केले होते तर, प्रेक्षकांमध्ये आपल्या नृत्य आणि अ‍ॅक्शनच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण करणारा हृतिक, हे दोघे एकाच पडद्यावर आल्यामुळे दोघांनाही एकाचवेळी पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. यामध्ये अनुभवी हृतिक प्रेक्षकांना भावलाच पण टायगरने प्रेक्षकांवर आपली छाप सोडली.

या दोघांनंतर आता सरस ठरतोय तो विद्युत जामवाल. खलनायक म्हणून पदार्पण करणारा विद्युत आता तरुणांमध्ये हिरो ठरला आहे. पीळदार शरीरयष्टी आणि स्टंट्स-फाइट्सच्या जोरावर ‘कमांडो’ या सिनेमाच्या दोन्ही भागांतून आपला चाहता वर्ग तयार करण्यात त्याने मोठय़ा प्रमाणात यश मिळविलं आहे. ‘कमांडो’च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागांमध्ये विद्युत जामवालने प्रेक्षकांची मने सहजच जिंकली. त्यातील त्याचे स्टंट्स आणि फाईट्स लोकांच्या लक्षात राहिल्या. त्यामुळे ‘कमांडो थ्री’मध्ये काय असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. त्यामुळे हा सिनेमा बाजारात येण्यापूर्वीच सात कोटींचा आकडा पार केलेला होता. ‘कमांडो’च्या दोन्ही भागांत अवाक्  करणाऱ्या अ‍ॅक्शन्स, नाटय़मयता आणि संवादफेकीमध्ये हृतिक आणि टायगरच्या बरोबरीने विद्युतनेदेखील आघाडी घेतली होती. त्यामुळे ‘कमांडो थ्री’ने मल्टीस्टारर, दुप्पट बजेटच्या ‘पागलपंती’ला मागे टाकले आहे.

खरं तर सोशल मीडियावर हृतिक, टायगर आणि विद्युत या तिघांनाही तरुणांकडून प्रचंड पसंती आहे. त्यात ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या तिघांमध्ये हृतिक रोशन प्रथम क्रमांकावर आहे. त्याला ट्विटरवर अडीच कोटीपेक्षा जास्त लोक फॉलो करतात तर, फेसबुकवर सुमारे दीड कोटीपेक्षा जास्त आणि इन्स्टाग्रामवर दोन कोटी वीस लाख जण हृतिक रोशनला फॉलो करताना दिसतात. दुसऱ्या क्रमांकावर आहे तो टायगर श्रॉफ. ट्विटरवर त्याच्या फॉलोअर्सचा आकडा ३७ लाखांवर गेला आहे. तसेच फेसबुकवर ८५ लाखांपेक्षा जास्त लाईक्स, तर इन्स्टाग्रामवर एक कोटीहून अधिक फॉलोअर्स त्याने मिळविलेले आहेत. या दोघांच्या तुलनेत विद्युत जामवाल मात्र मागे आहे. त्याच्या ट्विटर फॉलअर्सची संख्या एक लाख ७६ हजार आहे, तर त्याचे फेसबुक पेज ५५ लाख लोकांनी लाईककेले आहे. तर इन्स्टाग्रामवर ३६ लाखांवर त्याला फॉलोअर्स मिळालेले आहेत. या तिघांमध्ये सोशल मीडियावर हृतिक रोशनच लोकांच्या मनावर अधिराज्य करणारा ठरला आहे. अर्थात तो या दोघांच्या कितीतरी आधी सिनेसृष्टीत आल्याचा त्याला फायदा मिळाला आहे, असं म्हणता येईल.

‘क्रिश’, ‘बागी’ आणि ‘कमांडो’ या सिनेमांच्या मालिकांमध्ये पीळदार शरीरयष्टी, जोरदार फाईट्स, तुफान संवादफेक, आकर्षक नृत्ये आणि कथानक यामुळे लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं आहे. अर्थात शरीरयष्टीसाठी टायगर आणि विद्युत जामवाल यांच्या तुलनेत हृतिकलाच जास्त पसंती आहे. आपल्या फिटनेससाठी हृतिक खूप कष्ट करतो, हे दाखविणारा व्हिडीओ नुकताच लोकांच्या समोर आला. सुपर-३०साठी वाढविलेले वजन ‘वॉर’ चित्रपटासाठी पूर्ववत करणे गरजेचे होते. त्यासाठी त्याने जिममध्ये किती कष्ट घेतले हे दाखविणारा तो व्हिडीओ होता. यामुळे चाहता वर्ग हृतिकवर आणखी खूश झाला. टायगर आणि विद्युतच्या तुलनेत हृतिकच्या ट्रायसेप्स, बायसेप्स, अ‍ॅब्ज तसंच शोल्डरने महाविद्यालयातील तरुणांना व्यायामाच्या प्रेमात पाडलेलं आहे. त्यामुळे जो-तो व्यायामशाळेत हृतिक, टायगर, विद्युतसारखी बॉडी तयार करण्यासाठी धडपड करत आहे. टायगर श्रॉफ आणि विद्युत जामवाल मार्शल आर्टमध्येदेखील चांगलेच निपुण आहेत. अ‍ॅक्शन सिनेमा ‘आज’ हृतिकचा असला तरी ‘उद्या’ मात्र या दोघांचा आहे.
सौजन्य – लोकप्रभा