News Flash

आजही हृतिक माझा आधार- सुझान खान

ते मला आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देतात

हृतिक आणि सुझान

हृतिक रोशन आणि सुझान खान हे बॉलिवूडमधले प्रसिद्ध जोडपे २०१६ मध्ये विभिक्त झाले. १७ वर्षांचा संसार मोडून दोघांनी घटस्फोट घेतला. खरं तर विभिक्त होण्याचा निर्णय बॉलिवूडच काय पण हृतिकच्या चाहत्यांसाठीही धक्कादायक होता. एकमेकांवर कोणतेही आरोप प्रत्यारोप न करता हे दोघे विभक्त झाले. मात्र विभक्त होण्याचे कारण दोघांनीही कोणाला कळू दिले नाही.

त्या दोघांच्या घटस्फोटानंतरही सुझान म्हणते की, ‘आजही हृतिक माझा आधार आहे. आम्ही पती-पत्नी नसलो तरी चांगले मित्रमैत्रीण आहोत. त्यामुळे मला कधीच एकटं वाटत नाही.’ सुझान रेहान आणि रिदानच्या बाबतीत फार महत्वकांशी आहे. ‘मला माझ्या मुलांपासून एक वेगळीच ताकद मिळते. ते जणू काही माझ्या ऊर्जेचा स्त्रोत आहेत आणि तेच मला आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देतात. एकल माता असणे आणि कामा सोबतच आईची भूमिका पार पाडणे ही एक तारेवरची कसरत असते’ असे सुझान पुढे सांगते.

घटस्फोटाचा परिणाम मुलांवर होऊ नये याची पुरेपूर काळजी हृतिक आणि सुझान घेत असतात. मुलांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेणे, एकत्र डिनरला जाणे अशा छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी हृतिक- सुझान एकत्र येत असतात.

गेल्या काही वर्षांत कंगनाच्या आरोपांमुळे हृतिक वादात सापडला पण, त्यावेळीदेखील सुझान हृतिकच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली. एक नाते संपुष्टात आले तरी या दोघांनी आपल्यातील मैत्रीचे नाते मात्र कायम ठेवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 2:38 pm

Web Title: hrithik roshans ex wife sussanne khan opens up about her relationship with him
Next Stories
1 Video : चिरंजीवी यांच्या फार्महाऊसला भीषण आग
2 Avengers Endgame ला सर्वात कंटाळवाणा सिनेमा म्हणणाऱ्या शोभा डे झाल्या ट्रोल
3 आमिर खानचा रिंकू राजगुरूला बहुमोलाचा सल्ला
Just Now!
X