29 November 2020

News Flash

हृतिक रोशनच्या आईला करोनाची लागण

हृतिकची आई लक्षणं नसतानाही करोना पॉझिटिव्ह; तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार सुरु

करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अवश्य पाहा – ‘भाजपाला मत द्या अन्यथा लस मिळणार नाही?’; भाजपाच्या जाहिरनाम्यावर दिग्दर्शकाचा सवाल

एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पिंकी रोशन यांनी करोनावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “होय मी बॉर्डरलाईन करोना पॉझिटिव्ह आहे. पाच दिवसांपूर्वी मी आणि माझ्या घरातील सर्व कर्मचाऱ्यांनी करोना टेस्ट दिली होती. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. खरं तर मला करोनाचे कोणतेही लक्षण जाणवले नाहीत. परंतु डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार मला करोना होऊन गेला आहे. सध्या मी बॉर्डरलाईन पॉझिटिव्ह आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरातच माझ्यावर उपचार सुरु आहेत. पुढील १५ दिवस मला क्वारंटाइनमध्येच राहण्यास सांगितलं गेलं आहे.”

अवश्य पाहा – ‘घरात १० दिवस बंद राहून पाहा मग कळेल’; ‘बिग बॉस’ स्पर्धक ट्रोलर्सवर संतापली

महाराष्ट्रात १३ लाख ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त

महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये ७ हजा ४२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या १३ लाख ९२ हजार ३०८ इतकी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८६.५ टक्के इतका झाला. मागील २४ तासांमध्ये ८ हजार १५१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये २१३ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या १६ लाख ९ हजार ५१६ इतकी झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 5:35 pm

Web Title: hrithik roshans mother pinkie roshan coronavirus positive mppg 94
Next Stories
1 दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन
2 ‘या’ शहरांत ‘मिर्झापूर २’च्या कलाकारांचे भव्य कटआऊट्स
3 रिलेशनशिप स्टेटसबद्दल कियारा म्हणते, “लग्न होईपर्यंत मी…”
Just Now!
X