आपण आजवर कलाकारांच्या नावाचा उल्लेख असलेली गाणी ऐकली आहेत. पण एखाद्या चित्रपटाला बॉलीवूड कलाकाराचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ असेल. बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशनच्या नावावरून एका मल्याळम चित्रपटाचे नाव  कट्टप्पनयिले हृतिक रोशन (Kattappanayile Hrithik Roshan) असे ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे रिजनल चित्रपट असूनही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली.

या चित्रपटाची कथा ही आपल्या मुलाने अभिनेता व्हावे अशी इच्छा असलेल्या मुलावर आहे. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता तो मुलगा कष्ट करतो. हा चित्रपट केवळ ती भाषा जाणणारे प्रेक्षक पाहत नसून हृतिकचे चाहतेही बघत आहेत. हृतिक रोशनच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाची कथा आणि शीर्षक ऐकून हृतिकला आनंद तर झालाच पण त्याला धक्काही बसला. अनेकांनी हृतिकला हा चित्रपट पाहण्याची विनंतीही केल्याचे कळते. हा चित्रपट मुंबईतही प्रदर्शित करण्यात आला आहे. नेटिझन्सनी हृतिकच्या वॉलवर जेव्हा सदर चित्रपटाबाबत पोस्ट करणे सुरु केले तेव्हा त्याला याबाबत माहिती मिळाली.

चित्रपटांबाबत बोलाल तर राकेश रोशन यांचा मुलगा आणि अभिनेता असलेला हृतिक लवकरच काबिल या चित्रपटात दिसेल. यात तो आपल्या प्रेयसीच्या हत्येचा बदला घेणा-या एका अंध प्रियकराच्या भूमिकेत दिसेल. त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत यामी गौतम दिसेल. याव्यतिरीक्त क्रिश ४चे चित्रीकरण सुरु झाल्याचे कळते. मात्र, या चित्रपटात कोणती अभिनेत्री दिसणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.

kattappanayile-hrithik-roshan