News Flash

हृतिक रोशनचं कोणाकडे आहे एवढं लक्ष?; चाहत्यांच्या या भन्नाट कमेंट्स वाचाच

इन्स्टाग्रामवर शेअर केले काम करतानाचे फोटो

अभिनेता हृतिक रोशन कायमच आपले फोटो टाकून चाहत्यांच्या हृदयाचा ठाव घेत असतो. आजही त्याने टाकलेले हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या घरी होत असलेल्या एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यानचे हे फोटो असावेत.

यात तो फारच लक्ष देऊन लॅपटॉपमध्ये काहीतरी बघत आहे. हा फोटो शेअर करत तो म्हणतो, “माझ्या सिरीयस चेहऱ्याकडे पाहून भुलू नका. तो मेन्यू आहे.” त्याचसोबत त्याने #itakemyfoodveryseriously #missinmysamosas असे हॅशटॅग्जही दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

त्याचे मित्र आणि चाहत्यांनी यावर कमेंट्समध्ये तुफान रिप्लाय दिले आहेत. काही तासांतच जवळपास १.५ मिलीयन कमेंट्स त्याच्या या पोस्टवर आल्या आहेत. हृतिकची ‘कोई मिल गया’ चित्रपटातली सहकलाकार प्रीती झिंटा म्हणते, “मी पण” तर टायगर श्रॉफ आणि हुमा कुरेशी त्याच्या या पोस्टवर हसत आहेत. त्याचे वडील आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांनीही “हाहाहा” अशी कमेंट त्याच्या या फोटोवर केली आहे.

त्याच्या चाहत्यांना तर तो समोसा खात असेल यावर विश्वासच बसत नाही. एकाने कमेंट केली आहे, “तुला असं वाटत आहे की तू समोसा खातोस यावर आमचा विश्वास बसेल?” त्याच्या या कमेंटला हृतिकने उत्तरही दिलं आहे. त्यात तो म्हणतो, “अजून काही चांगलं आहे का?” अजून एक चाहता म्हणतो, “तुझं नाक इतकं तीक्ष्ण आहे की तू खरंच समोस्यासाठीचे बटाटे कापू शकशील.” त्यावरही हृतिक म्हणतो, “नक्कीच पण त्याने माझ्या नाकपुड्या बंद पडतील.” हृतिकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अजून एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तो कोणाशीतरी बोलत आहे. यावर त्याने वर्क फ्रॉम होम डे असं कॅप्शनही दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:59 pm

Web Title: hritik roshan is thinking about samosa shared a photo on instagram vsk 98
Next Stories
1 तेलुगू सुपरस्टार नागार्जुनने घेतली लस
2 प्रतिक्षा संपली! ‘रात्रीस खेळ चाले 3’ या दिवशी येणार भेटीला
3 उर्वशीने शेअर केला विराटचा तरुणपणीचा फोटो, चाहत्यांकडे मदत मागत म्हणाली…
Just Now!
X