22 October 2020

News Flash

‘सुपर ३०’ची सेंच्युरी!

कमाईच्या आकडेवारीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे

सुपर ३०

आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘सुपर ३०’ हा चित्रपट शुक्रवारी (१२ जुलै) प्रदर्शित झाला. कोणाताही आधार नसलेली मुलंसुद्धा देशातील बुद्धिमान व्यक्तीमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी आनंद कुमार संघर्ष करत राहिले. त्याचा हाच जीवनप्रवास ‘सुपर ३०’मधून उलगडण्यात आला आहे. पहिल्या दिवसांपासून प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असलेल्या या चित्रपटाने १०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन याची मुख्य भूमिका आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन या चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने एकूण १००.५८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या कमाईच्या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

‘सुपर ३०’ने पहिल्या दिवशी ११.८३ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर या कमाईच्या आकडेवारीमध्ये कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, ‘सुपर ३०’ या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एन्टटेंन्मेंट आणि फँटम फिल्म्सच्या अंतर्गत करण्यात आली आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आहे. हा चित्रपट आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित असून आनंद कुमार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 11:14 am

Web Title: hritik roshans film super 30 box office collection 100 crore cross ssj 93
Next Stories
1 ‘सेक्रेड गेम्स २’च्या कथेबद्दल सैफ अली खानने केला हा खुलासा
2 Video : आईसोबत या गाण्यावर थिरकला सलमान खान
3 ‘चांद्रयान २’च्या यशस्वीरित्या प्रक्षेपणानंतर प्रभास म्हणतो…
Just Now!
X