मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लाखो तरुणांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे. ऋताने छोट्या पडद्यावरील ‘दुर्वा’ या मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. या पहिल्या वहिल्या मालिकेत काम करत असताना ऋता रुईया कॉलेजमधून शिक्षण घेत होती. तिने नुकताच ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

ऋताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतही काम केले. या मालिकेने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. आज तिचा चाहता वर्ग खूप मोठा असल्याचे पाहायला मिळते. लवकर ऋता ‘अनन्या’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.